सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे आयपीएल जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे. या गोष्टीचा धक्का बीसीसीआय, संघ मालक आ
णि खेळाडूंनाही बसू शकतो. त्यामुळे आयपीएल खेळवण्याचा एक फॉर्म्युला राजस्थान रॉयन्सच्या संघाने पुढे आणला आहे. यानुसार आयपीएल ही कमी कालावधीमध्ये होऊ शकते आणि समस्याही जास्त येणार नाही, असे म्हटले जात आहे.

करोना व्हायरसमुळे जवळपास सर्वच देशांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंद केला आहे. त्यामुळे आयपीएल खेळण्यासाठी परदेशी खेळाडू तयार असले तरी त्यांना भारतामध्ये येता येणार नाही. त्यामुळे आयपीएल खेळवण्याची समस्या बिकट असल्याचे म्हटले जात आहे. पण यावर तोडगा राजस्थान रॉयल्सच्या संघाने काढलेला आहे.

राजस्थान रॉयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंजित बरठाकूर यांनी सांगितले की, ” सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरसमुळे चिंताग्रस्त वातावरण आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल होणार की नाही याबद्दल काही जणांच्या मनात शंका आहे. पण एक गोष्ट केली तर यंदाची आयपीएल खेळवण्यात येऊ शकते. पण त्यामध्ये फक्त भारतीय खेळाडूंचा समावेश करावा आणि सामन्यांची संख्या कमी करावी, असे केल्यास यंदाचे आयपीएल होऊ शकते. सध्याच्या घडीला परदेशी खेळाडू येणार की नाही याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे त्यावर हा पर्याय काढता येऊ शकतो आणि आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ”

ते पुढे म्हणाले की, ” बीसीसीआयला जर आयपीएल खेळवायची असेल तर त्यांना सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. कारण सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती साधारण नाही. त्याचबरोबर त्यांच्यावर बरेच दडपण असू शकते. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून बीसीसीआयला आयपीएल खेळवायची की नाही, हा निर्णय घ्यावा लागणार आहे. पूर्वी फक्त भारतीय खेळाडूंचाच विचार आयपीएलसाठी केला जात नव्हता. कारण जगभरातील सर्व खेळाडूंचा विचार आयपीएल भरवताना केला जात होता. पण सध्याच्या घडीला बिकट परिस्थिती आहे. या परिस्थितीचा सामना करायला असेल, त्यामधून बाहेर पडायचे असेल आणि आयपीएल खेळवायची असेल तर सध्याच्या घडीला फक्त भारतीय खेळाडूंचाच विचार करावा लागेल.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here