सध्याच्या घडीला करोना व्हायरसचा मोठा फटका क्रीडा जगताला बसलेला आहे. या परिस्थितीतून आपण सर्व कधी बाहेर येणार, हे कोणीही सध्याच्या घडीला सांगू शकत नाही. पण या परिस्थितीतून बाहेर आल्यावर इंग्लंडचे दोन संघ एकाचवेळी मैदानात उतरवण्याची आमची तयारी आहे, असे मत इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने व्यक्त केले आहे.

सध्याच्या घडीला जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही देशात क्रीडा स्पर्धा होताना दिसत नाहीत. पण जेव्हा सारे सुरळीत होईल, तेव्हा मात्र कमी कालावधीमध्ये जास्त सामने घेण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी इंग्लंडने हा नवीन फॉर्म्युला शोधून काढला आहे.

याबाबत मॉर्गन म्हणाला की, ” सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरसमुळे वातावरण चिंताग्रस्त आहे. पण ही परिस्थितीही नक्कीच बदलेल. पण जेव्हा ही परिस्थिती बदलेल त्यावेळी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठीच एकावेळेला दोन स्पर्धा खेळण्याचे आव्हान आम्ही स्वीकारत आहोत. त्यासाठी एकाचवेळी इंग्लंडचे दोन संघ मैदानात उतरलेले तुम्हाला पाहायला मिळतील.”

इंग्लंड बोर्डाची तब्बल ५७० कोटींची मदतकरोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन आहे. यावेळी बऱ्याच क्रीडा संघटना आणि खेळाडू मदतीसाठी पुढे येताना दिसत आहे. आता तर इग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने तब्बल ५७० कोटी रुपयांची मदत दिल्याचे जाहीर केले आहे.

कही दिवसांपूर्वी बीसीसीआ.ने ५१ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. त्याच्यापुढे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा आकडा पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पण इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने ६१ दशलक्ष पाऊंड एवढी मदत जाहीर केली आहे.

सध्याच्या घडीला इंग्लंडमध्येही लॉकडाऊन आहे. त्यामुळे इंग्लंडमधील क्रिकेट पूर्णपणे बंद आहे. या काळात कौंटी आणि व्यावसायिक क्रिकेटपटूंच्या मदतीसाठी इंग्लंडच्या मंडळाने तब्बल ५७० कोटी एवढी रक्कम देण्याचे ठरवले आहे.

इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने २०२०-२१ या कालावधीसाठी तब्बल ४० दशलक्ष पाऊंड एवढी रक्कम कौंटी क्लबला देण्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले होते. पण आता त्यांना ही रक्कम तात्काळ देण्यात येणार आहे. त्याव्यतीरीक्त ५.५ दशलक्ष पाऊंड एवढी जास्त रक्कम त्यांना या काळात देण्यात येणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here