करोना व्हायरसचा मोठा फटका टेनिस विश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेलाही बसल्याचे पाहायला मिळत आहे. करोनामुळे यावर्षी होणारी विम्बल्डन टेनिस स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही स्पर्धा पुढच्या वर्षी २८ जुन ते ११ जुलै या कालावधीमध्ये होणार आहे.

करोना व्हायरसचा मोठा फटका आता फुटबॉललाही बसायला सुरुवात झाली आहे. फुटबॉल विश्वात मानाची समजली जाणारी चॅम्पियन्स लीग स्पर्धा यंदाच्या वर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर युरोपा लीग आणि युरो चषकाच्या सामन्यांवर या गोष्टीचा मोठा परीणाम होणार आहे.

करोना व्हायरसचा फटका चार वर्षांतून एकदा खेळवल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेलाही चांगलाच बसला आहे. कारण यावर्षी जपानमध्ये होणार ही स्पर्धा आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोना व्हायरसमुळे भारतातील क्रीडा स्पर्धांनाही चांगलाच धक्का बसला आहे. बीसीसीआयला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिका रद्द करावी लागली होती. त्याचबरोबर आयपीएलही आता पुढे ढकलण्यात आले आहे. यंदाचे आयीपीएल २९ मार्चपासून सुरु होणार होते. पण करोना व्हायरसमुळे यंदाचे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here