एंटिगा: भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा ९६ धावांनी पराभव करून १९ वर्षाखालील वर्ल्डकप २०२२च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाची फायनल उद्या ५ फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे.

वाचा- टीम इंडियाला आणखी एक धक्का; केएल राहुल पहिली वनडे खेळणार नाही

इंग्लंड संघाने २४ वर्षानंतर प्रथमच फायनलमध्ये प्रवेश केलाय. अंतिम सामन्यात इंग्लंडचा कसा पराभव करायचा आणि विक्रमी पाचवे विजेतेपद कसे मिळवायचे याबद्दल भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने टीम इंडियाला काही टिप्स दिल्या आहेत. विराटने भारताच्या या ज्युनिअर खेळाडूंना टिम्स दिल्याचे गोष्ट संघातील खेळाडू कौशल तांबेच्या इस्टाग्राम स्टेटसवरून लक्षात आली. या स्टेटसमध्ये विराटने १९ वर्षाखालील संघाला विराटने व्हिडिओ कॉलकरून काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. कौशलच्या स्टेटसमध्ये विराटने सर्व खेळाडूंना व्हिडिओ कॉल केल्याचे दिसते.

वाचा- BCCIने असा निर्णय का घेतला;विराटच्या १००व्या कसोटीचे ठिकाण बदलले

संघातील ऑलराउंडर राजवर्धन हॅगरगेकरने स्क्रीनशॉट शेअर करून लिहले आहे की, विराट कोहली भय्या तुमच्याशी चर्चा केल्यानंतर फार छान वाटले. क्रिकेट आणि आयुष्याबद्दल तुमच्याकडून फार महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता आल्या. येणाऱ्या काळात आम्हाला याचा फायदा होईल.

वाचा- गोलंदाज म्हणाला, थोडी दया दाखव; भारताच्या फलंदाजाने ५००च्या स्ट्राइक रेट धावा कुटल्या

विराटने देखील ज्युनिअर स्तरावर भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याने २००८ साली झालेल्या कुआलालम्पुर येथे झालेल्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. तेव्हापासून १४ वर्षात विराट भारतीय संघाचा कर्णधार होत आता अनुभवी कर्णधार आणि खेळाडू झालाय. विराटने १९ वर्षाखालील संघातील खेळाडूशी बोलण्याची विनंती बीसीसीआय सचिव जय शहा किंवा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी केली होती का हे अद्याप समजू शकले नाही. मात्र विराटने टीम इंडियातील खेळाडूंशी बोलून त्यांना प्रेरणा दिली आहे.

वाचा- संघाच्या खराब कामगिरीमुळे क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सलग चौथ्यांचा फायनलमध्ये स्थान मिळवले. भारताने आतापर्यंत सर्वाधिक ४ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here