नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने ९ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आयसीसी वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले होते. भारतीय संघाच्या या विजयाची चर्चा आज सोशल मीडियावर सुरु आहे. यातच आता गौतम गंभीरचे एक ट्वीट व्हायरल होत आहे.

वाचा-
करोना व्हायरसमुळे सध्या क्रिकेट सामने बंद आहेत. त्यामुळेच जी काही चर्चा होते ती याआधी झालेल्या क्रीडा विश्वातील घडामोडींवर… आज म्हणजे २ एप्रिल रोजी भारतीय संघाने २०११ साली वर्ल्ड कप जिंकला होता. सोशल मीडियावर सर्वजण या घटनेला उजाळा देत आहेत. अशातच एका क्रिकेट वेबसाईटने भारतीय संघाच्या वर्ल्ड कप विजयामध्ये अंतिम सामन्यात महेंद्र सिंह धोनीने मारलेल्या विजयी षटकाराला अतिमहत्त्व दिल्याने गंभीर भडकला.

वाचा-
संबंधित वेबसाइटने केलेले ट्विट पोस्ट करत गंभीर म्हणतो. फक्त तुमच्या माहितीसाठी म्हणून २०११चा क्रिकेट वर्ल्ड कप संपूर्ण भारतीय संघाने आणि त्याच्या सपोर्ट स्टफने जिंकला होता. त्यामुळे तुमच्या या अतिउत्साहाला षटकारासारखे बाहेर पाठवण्याची गरज आहे.

वाचा-

फक्त धोनीने मारलेल्या त्या एका षटकाराला अधिक महत्त्व दिल्याने गंभीरने सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली. श्रीलंकेविरुद्धच्या त्या सामन्यात गोलंदाजीत जहीर खान तर फलंदाजीत आणि धोनी यांनी दमदार कामगिरी केली होती. श्रीलंकेने दिलेल्या २७५ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात फार चांगली झाली नाही. विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर लवकर बाद झाले. भारताची अवस्था २ बाद ३१ अशी होती. तेव्हा गंभीर आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी केली. विराट २२व्या षटकात बाद झाला. त्यानंतर युवराज सिंगच्या ऐवजी मैदानात आला भारताचा कर्णधार . त्याने गंभीरसह १०९ धावांची भागिदारी केली. गंभीर ९७ धावांवर बाद झाला.

त्यानंतर धोनीने युवराजसह नाबाद ५४ धावांची भागिदारी केली आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. युवराजने २४ चेंडूत २१ तर धोनीनी ७९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ९१ धावा केल्या.

गंभीरने फक्त २०११च्या नाही तर २००७च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताकडून अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. भारतीय संघाला जेव्हा गरज होती तेव्हा गंभीरने एक महत्त्वाची धावसंख्या उभी केली होती. पण अंतिम सामन्यात धोनीच्या खेळीची अधिक चर्चा झाली आणि त्यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here