नवी दिल्ली: २ एप्रिल २०११ हा दिवस कोणताही भारतीय क्रिकेट चाहता विसरणार नाही. याच दिवशी आजपासून ९ वर्षांपूर्वी भारतीय संघाने दुसऱ्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. तोही घरच्या मैदानावर. त्याआधी २८ वर्षांपूर्वी कपील देवच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. भारतीय क्रिकेट चाहत्यांना हा सामना आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

वाचा-
श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात २७५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाकडून गौतम गंभीरने सर्वाधिक ९७ धावा केल्या होत्या. लंकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. महेला जयवर्धनेची नाबाद शतकी खेळीने लंकेने ६ बाद २७४ धावा केल्या.

वाचा-
भारताची सुरुवात फार चांगली झाली नाही. विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर लवकर बाद झाले. भारताची अवस्था २ बाद ३१ अशी होती. तेव्हा गंभीर आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी केली. विराट २२व्या षटकात बाद झाला. त्यानंतर युवराज सिंगच्या ऐवजी मैदानात आला भारताचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी. त्याने गंभीरसह १०९ धावांची भागिदारी केली. गंभीर ९७ धावांवर बाद झाला.

वाचा-

त्यानंतर धोनीने युवराजसह नाबाद ५४ धावांची भागिदारी केली आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. युवराजने २४ चेंडूत २१ तर धोनीनी ७९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ९१ धावा केल्या.

भारतीय क्रिकेट संघाने २८ वर्षानंतर वनडे वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले आणि सचिन तेंडुलकरचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. या विजयानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलून मैदानाची फेरी मारली. काही दिवसांपूर्वी सचिनच्या या फोटोला क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम क्षणाचा पुरस्कार मिळाला होता.

करोना व्हायरसमुळे सध्या क्रिकेटचे सामने स्थगित करण्यात आले आहेत. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाचा सामना तुम्ही आज दुपारी दोन वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता.

चाहते आयसीसीच्या फेसबुक पेजवर देखील हा सामना दुपारी २.३० पासून पाहू शकतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here