Ipl Mega Auction 2022, बंगळुरू : महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने या मेगा लिलावात मोठा गेम केल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईच्या संघाने डबल किंमत मोजत ड्वेन ब्राव्होला संघात घेतले खरे, पण जो खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत होता त्यालाच संघाबाहेर करत त्यांनी सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.
ब्राव्होसाठी या लिलावात २.२० कोटी एवढी मूळ किंमत ठेवण्यात आली होती. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई यांच्यामध्ये ब्राव्होला संघात घेण्यासाठी चांगलीच चुरस लागली. पण यावेळी चेन्नईच्या संघाने ४.४० कोटी रुपये मोजत ब्राव्होला आपल्या संघात दाखल करून घेतले. पण दुसरीकडे सुरेश रैना हा चेन्नईचा भावी कर्णधार समजला जात होता. रैनासाठी यावेळी २.०० कोटी रुपये एवढी मूळ किंमत ठेवण्यात आली होती. यावेळी रैनावर कोणीही बोली लावण्यासाठी उत्सुक नव्हते त्यामुळे चेन्नईच्या संघाला त्याच्या मूळ किंमतीमध्ये त्याला आपल्या ताफ्यात दाखल करता आले असते. पण चेन्नईच्या संघाने रैनाला संघात घेण्यात उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे रैनाला या लिलावात कोणीच वाली ठरला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता चेन्नईच्या कर्णधारपदी जर धोनी विराजमान झाला नाही तर रवींद्र जडेजाकडे नेतृत्व सोपवण्यात येऊ शकते, हे आता स्पष्ट झाले आहे.

चेन्नई आणि धोनी या लिलाात नेमकं काय करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. धोनी त्याच्या संघातील काही जुन्या खेळाडूंना नक्कीच खरेदी करेल. या खेळाडूंमध्ये फाफ डू प्लेसिस, अंबाती रायडू, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवूड आणि ड्वेन ब्राव्हो या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी चेन्नई सुपर किंग्जला एक मजबूत संघ बनवले आहे. त्यामुळे या खेळाडूंसाठी चेन्नईचा संघ नक्कीच चांगली किंमत मोजेल, असे म्हटले जात होते. पण रैनाला संघात न घेता त्यांनी सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या पर्समध्ये ४८ कोटी रुपये लिलावापूर्वी होते. त्यामुळे आता चेन्नईचा संघ कोणत्या खेळाडूंना संघात स्थान देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here