बेंगळुरू: आयपीएल २०२२च्या लिलावाला बेंगळुरू येथे सुरूवात झाली आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी ७४ खेळाडूंचा लिलाव झाला. यात भारतीयांसह काही परदेशी खेळाडूंचा समावेश होता. लिलाव प्रक्रिया सुरू असताना भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा ३-० असा पराभव केला. आता १६ फेब्रुवारीपासून दोन्ही संघात ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे.

वाचा- IPL Season 15 Auction 2022 Day 2 Live Updates: आयपीएल २०२२ लिलावाचा दुसरा दिवस जाणून अपडेट

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेची तयारी सुरू करण्याआधी टीम इंडियातील खेळाडूंनी एकत्र बसून आयपीएलला मेगा लिलाव पाहिला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने इंस्टाग्रामवर लिलाव पाहत असलेल्या भारतीय खेळाडूंचा फोटो शेअर केलाय. या फोटोत युजवेंद्र चहल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू दिसत आहेत. फोटो शेअर करताना रोहित म्हणतो, थोडे टेन्शन तर काही आनंदी चेहरे. या फोटोतील पंत आणि सूर्यकुमार यादव यांना लिलावात बोली लावली नाही. त्यांना संघांनी आधीच रिटने केले आहे.

वाचा- आर्थिक अडचणींमुळे वडिलांचे दुकान झाले बंद; IPL मध्ये लागली २.६ कोटींची बोली; बहीणही आहे क्रिकेटपटू

रोहितने शेअर केलेला फोटो

वाचा- IPLच्या इतिहासात प्रथमच असे घडले, लिलावात

गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने १२ कोटी २५ लाखांना खरेदी केले. कर्णधारपद न दिल्याने श्रेयसने दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता संघाकडे सध्या कर्णधार नाही. आता आगामी हंगामात श्रेयसकडे नेतृत्व दिले जाऊ शकते. जलद गोलंदाज आणि ऑलराउंडर शार्दूल ठाकूरला दिल्ली कॅपिटल्सने १० कोटी ७५ लाखांना खरेदी केले. तो गेल्या हंगामात चेन्नई संघाकडून खेळत होता.

ईशान किशनला या लिलावात सर्वाधिक बोली मिळाली. त्याला मुंबईने १५ कोटी २५ लाखांना खरेदी केले. गेल्या वर्षी ईशान मुंबईकडून खेळत होता. पण त्याला रिटेन केले नव्हते. युजवेंद्र चहल आता राजस्थानकडून खेळताना दिसेल. त्यासाठी ६ कोटी ५ लाख मोजले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here