Indian Premier League 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगमासाठी बंगळुरुमध्ये दोन दिवसांचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात चेन्नई संघाने आपल्या अनेक खेळाडूंना खरेदी केलं. दीपक चाहर, उथप्पा, डेवेन ब्राव्हो, रायडू यासारख्या अनुभवी खेळाडूंना चेन्नईने पुन्हा एकदा आपल्या संघात परत घेतलं. पण या लिलावामध्ये चेन्नईने सुरेश रैनाकडे पाठ फिरवली. एकेकाळी चेन्नईच्या संघाची भिस्त असणाऱ्या रैनावर चेन्नईने साधी बोलीही लावली नाही. दोन दिवसांच्या लिलावात सुरेश रैना अनसोल्ड राहिला. 

सुरेश रैनाला खरेदी न केल्यामुळे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. आपली नाराजी चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने तर सुरेश रैनाशिवाय चेन्नईचा संघ म्हणजे विनासाखरेचा चहा असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल होत आहेत. 

सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल म्हणून ओळखले जाते. आयपीमध्ये सुरेश रैनाने 39 अर्थशतकासह 5000 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. तसेच सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही रैनाच्या नावावर आहे. सुरेश रैनाला चेन्नईत न घेण्यास कर्णधार एम. एस. धोनी जबाबदार असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.  चेन्नई संघाला टॅग करत अनेकांनी आपला राग व्यक्त केला आहे.

 एक काळ गाजवलेल्या मिस्टर आयपीएलला यंदा बेस प्राईसलाही कोणत्या संघाने खरेदी केलं नाही. त्याचा संघ चेन्नई सुपरकिंग्सने त्याला विकत न घेतल्याने अनेक सीएसके फॅन्सची मनं तुटली असून चेन्नईने एक पोस्ट करत रैनाला अलविदा केला आहे.

 

मागील आयपीएलमध्ये कमी सामन्यात संधी मिळालेल्या रैनाला खास खेळ दाखवता आला नाही. त्याआधीच्या आयपीएलमध्येही कोरोनाच्या संकटामुळे तो युएईत गेला नव्हता. ज्यानंतर यंदा त्याला संघाने रिटेन केलं नाही. पण लिलावात त्याला पुन्हा संघात घेतील अशी आशा साऱ्यांनाच होती. पहिल्या दिवशी कोणीही विकत न घेतल्याने दुसऱ्या दिवशीतरी अखेर चेन्नईचा संघ रैनाला विकत घेईल असे वाटत होते. पण 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईसमध्येही त्याला कोणीही विकत घेतले नाही. त्यामुळे एक काळ गाजवलेला रैना आता आयपीएल गाजवताना दिसणार नाही.

 

असा आहे अंतिम चेन्नई सुपर किंग्सचा ताफा (25 खेळाडू)

शिलेदार – रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here