भारताचे माजी फिरकीपटू यांनी श्रीलंकेविरुद्ध ऑगस्ट १९९७ मध्ये पदार्पण केले होते. निलेश यांचा जन्म ३ एप्रिल रोजी १९७३ रोजी डोंबिवली येथे झाला. पहिल्याच कसोटी सामन्यातील पहिल्या चेंडूवर निलेश यांनी मार्वन अटापटूची विकेट घेतली होती. या पहिल्या सामन्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली नाही. पण अशी कामगिरी करणारे हे पहिले भारतीय गोलंदाज ठरले. पहिल्या सामन्यात ७० षटकात १७० धावा देत त्यांना फक्त एक विकेट घेता आली.
वाचा-
कोलंबोत झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजीकरत ८ बाद ५३७ धावा केल्या होत्या. भारताकडून पहिल्या डावात नवज्योत सिंद्धू , आणि मोहम्मद अझरूद्दीन यांनी शतकी खेळी केली होती. सचिने सर्वाधिक १४३, अझरने १२६ तर सिद्धूने १११ धावा केल्या.
निलेश यांनी लंकेच्या डावातील पहिली विकेट घेतली. त्यांनी अटापट्टूला २६ धावांवर बाद केले. लंकेने त्यांच्या पहिल्या डावात ६ बाद ९५२ धावांचा डोंगर उभा केला. सनथ जयसूर्याने ३४० धावा तर रोशन महानामाने २२५ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७६ धावांची विशाल भागिदारी केली होती.
जयसूर्याने ५७८ चेंडूत ३६ चौकार आणि २ षटकार मारले होते. तर गोलंदाजीत ४५ धावा देत ३ विकेट घेतल्या. लंकेकडून अरविंदा डिसिल्वाने १२६, अर्जुन रणतुंगाने ८६ तर महेला जयवर्धनेने ६६ धावा केल्या होत्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times