मेलबर्न :ऑस्ट्रेलिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल लवकरच भारतीय वंशाच्या विनी रमनसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री कस्तुरी शंकरने तिच्या ट्विटर हँडलवर ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन यांच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. ही पत्रिका सध्याच्या घडीला जगभरात चांगलीच व्हायरल झाली आहे.

मॅक्सवेलची पत्रिका (सौजन्य-सोशल मीडिया)

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन यांनी अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लग्नपत्रिका शेअर करताना कस्तुरी शंकरने लिहिले आहे की, ‘ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन लग्न करणार आहेत. पारंपरिक तमिळ मुहूर्त मासिकानुसार, हे लग्न तमिळ-ब्राह्मण रितीरिवाजांनुसार होईल, असे आपण म्हणू शकतो. की ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न होईल? ग्लेन आणि विनीचे अभिनंदन!’ त्यामुळे आता मॅक्सवेलच्या लग्नाची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागलेली आहे.
ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन जवळपास पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांनी एंगेजमेंट केली होती. भारतीय वंशाची विनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये राहते. इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार, विनी रमन ही व्यवसायाने फार्मासिस्ट आहे. विनीच्या कुटुंबाची मूळे चेन्नईत आहेत, पण तिचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला. विनीने ऑस्ट्रेलियात फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. विनीचे वडील व्यंकटरमण आणि आई विजयालक्ष्मी रमण तिच्या जन्मापूर्वीच ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते.

विनी रमन आणि ग्लेन मॅक्सवेल जोडप्याला पॅरिस, लंडन, डब्लिन, न्यूझीलंड आणि इतर अनेक देशांमध्ये एकत्र फिरताना पाहिले आहे. त्यांचे फोटो याआधीही व्हायरल झाले आहेत. विनी रमनशी लग्न केल्यानंतर भारतीय मुलीशी लग्न करणारा मॅक्सवेल हा दुसरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरेल. याआधी वेगवान गोलंदाज शॉन टेटने मासूम सिंघा या भारतीय मुलीशी विवाह केला होता.

शॉन टेटने २०१४ मध्ये मॉडेल मासूम सिंघासोबत लग्न केले. आयपीएल २०१० मध्ये भाग घेण्यासाठी टेट भारतात आला होता. तेव्हा तो मासूमशी भेटला. चार वर्षानंतर दोघांनी लग्न केले होते. २००५ मध्ये किंगफिशर कॅलेंडरमध्ये मॉडेलिंग केल्यानंतर मासूम प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here