मुंबई: क्रिकेट चाहत्यांमध्ये गॉड ऑफ क्रिकेट अशी ओळख असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रम आहे. सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतकं असे रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. सचिनच्या चाहत्यांना त्याचे सर्व विक्रम आणि करिअरमधील अनेक छोट्या छोट्या गोष्टी माहीत असतील. पण आज आम्ही सचिनबद्दल तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी फार कमी लोकांना माहीत आहे.

सचिनने वनडे आणि कसोटीमध्ये सर्वाधिक धावा आणि शतकं केली आहेत. सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम देखील सचिनच्या नावावर आहे. असे असेल तरी क्रिकेटमधील या सर्वात महत्त्वाचा असलेल्या प्रकरात सचिन फक्त एकदा सलामीवीर म्हणून मैदानात उतरला आहे.

वाचा-
सचिनने १९८९ साली कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्यानंतर २०१३ पर्यंत सचिनने २०० कसोटीत ३२९ डाव खेळले. पण कसोटीत सलामीवीर म्हणून फक्त एकदाच सचिन मैदानात आला. कसोटीत पदार्पण केल्यानंतर १० वर्षांनी न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबाद येथील कसोटीत १९९९ मध्ये तो ओपनर म्हणून उतरला. या सामन्यातील पहिल्या डावात सचिनने द्विशतक झळकावले होते.

वाचा-
२९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या काळात झालेल्या सामन्यात सचिनकडे कर्णधारपद होते. पहिल्या डावात चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने द्विशतक केले होते. दुसऱ्या डावात भारताला वेगाने धावा करायच्या होत्या. त्यामुळे सचिन सलामीवीर म्हणून उतरला. पण सलामीवीर म्हणून उतरलेल्या या एकमेव डावात सचिनला १० चेंडूत ३ चौकारांसह १५ धावा करता आल्या.

आपल्या करिअरमध्ये २०० कसोटी खेळणाऱ्या सचिनने कधीच क्रमांक एक आणि तीनवर कधीच फलंदाजी केली नाही. वनडेचा विचार केल्यास क्रमांक एक आणि दोनवर सचिनने ३४० वेळा डावाची सुरुवात केली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here