वाचा-
भारतीय संघातील सलामीवीर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. कुटुंबासोबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो तो शेअर करतो. लॉकडाऊनंतर घरी पत्नीच्या आदेशावरून घरातील काम करतानाचा एक धम्माल व्हिडिओ शिखरने काही दिवासांपूर्वी शेअर केला होता. आता शिखरने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो अभिनेता जितेंद्रच्या भूमिकेत गेला आहे.
वाचा-
शिखरने पत्नी आयशा सोबत ‘ढल गया दिन, हो गई शाम’ या गाण्यावर डान्स केला. व्हिडिओत सचिनने जितेंद्रच्या स्टाइलमध्ये कपडे घातले आहेत आणि आयशाने लीना चंदावरकर या अभिनेत्रीसारखा लुक केला आहे.
हमजोली चित्रपटातील या गाण्यात जितेंद्र आणि लीना यांनी बॅडमिंटन खेळत अभिनय केला होता. तर शिखर आणि आयशाने टेबल टेनिस खेळत अभिनय केला आहे. सोशल मीडियावर शिखरच्या या व्हिडिओवर नेटिझन्स जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.
याआधी शिखरने घरात पडे धुवत आणि वॉशरूम साफ करताना असतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत शिखरची पत्नी आयशा त्याला काम करण्याचे ऑर्डर देत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना हिंदी चित्रपटातील ‘जब से हूई है शादी…’ हे गाणं जोडले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times