दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी टी-२०मधील ताजी क्रमवारी जाहीर केली. ताज्या क्रमवारीत भारताचा सलामीवीर केएल राहुल आणि माजी कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे चौथ्या आणि १०व्या स्थानावर आहेत. गोलंदाजीत आणि ऑलराउंडरमध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. २१व्या क्रमांकावर असलेला भुवनेश्वर कुमार हा गोलंदाजीत भारताचा अव्वल गोलंदाज आहे.

वाचा-

नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात श्रीलंकेच्या याला १०.७५ कोटींना खरेदी केले होते. लिलावाच्या वेळी हसरंगा टी-२०च्या गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. पण आता त्याने अव्वल स्थान गमावले आहे. ७६० रेटिंग पॉइंटसह हसरंगा तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज जोश हेजलवुड दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज तबरेज शम्सी अव्वल स्थानावर आहे. विशेष म्हणजे आयपीएल लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.

वाचा-

वनडे क्रमवारीत विराट कोहली आणि रोहित शर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानी कायम असून त्याचे ८७३ रेटिंग पॉइंट आहेत. विराटचे ८११ तर रोहितचे ७९१ पॉइंट आहेत. भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. सूर्यने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत ६४ तर अय्यरने तिसऱ्या वनडेत ८० धावा केल्या होत्या. ऋषभ पंत ४६९ पॉइंटसह ७१व्या स्थानावर आहे.

वाचा-

वनडेमधील गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह सातव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती. या मालिकेत ९ विकेट घेणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने ५०व्या स्थानावरून ४४व्या स्थानावर उडी मारली आहे. क्रमवारीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट अव्वल स्थानावर आहे.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here