करोना व्हायरसचा प्रकोप आपण संपूर्ण जगात पाहत आहोत. दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्याचबरोबर करोनाच्या चाचणीसाठी आता जागाही कमी पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता करोनाच्या चाचणीसाठी स्टेडियम खुला करण्याचा पर्याय अममंलात आणला जात आहे.

करोना व्हायरसचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला एकही क्रीडा स्पर्धा सुरु नाही. त्याचबरोबर क्रिकेटच्या सर्व मालिकाही रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला सर्व मैदानं रीकामी झालेली आहे. मैदानात कोणत्याही प्रकारचा सराव किंवा सामना खेळवला जात नाही. त्यामुळे आता करोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी क्रिकेटचे मैदान उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या जशी इटली, स्पेन, अमेरिया या देशांमध्ये वाढत आहे, तसेच चिंतेचे वातावरण इंग्लंडमध्येही आहे. इंग्लंडमधील वातावरण आता एवढे वाईट झाले आहे की, त्यांना करोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यासाठी आजा इंग्लंडमधील एजबस्टन हे मैदान करोना व्हायरसच्या चाचणीसाठी खुले करण्यात आले आहे. या मैदानात आता करोना व्हायरसची चाचणी होणार आहे. त्यामुळे काही काळ तरी करोना व्हायरसच्या चाचणीचा प्रश्न इंग्लंडमध्ये तरी संपला आहे, असे म्हटले जात आहे. पण आता हे मैदानही जर कमी पडायला लागले तर काय करायचे यावरही विचार विनिमय सुरु आहे.

करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी देशातील जनतेला संबोधित केले. ‘करोनाच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी फक्त ९ मिनिटे द्या. येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती किवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे. पण भारतातील परिस्थिती नेमकी कशी आहे आणि देशाला सध्याच्या कोणत्या गोष्टींची जास्त गरज आहे, यावर मात्र मोदी यांनी भाष्य टाळले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here