कनिका लखनौमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहिली होती तिथेच दक्षिण आफ्रिकेचा संघ राहीलेला होता. त्यामुळे आता त्यांच्या संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जेव्हापासून कनिका कपूर करोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं तेव्हापासून अनेक गोष्टी नव्याने समोर येत आहेत. देशभरात तिच्या नावाचीच चर्चा होताना दिसत आहे. सध्या कनिका इस्पितळात असून तिच्यावर योग्य ते उपचार केले जात आहेत.
कनिकाची पाचवी टेस्टही पॉझिटीव्ह असल्याचे कळल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघात चिंतेचे वातावरण होते. कारण कनिकाला जर एवढा करोना व्हायरसचा प्रार्दुभाव झाला असेल तर खेळाडूंचे काय होणार, हा प्रश्न त्यांच्या संघ व्यवस्थापनाला आणि क्रिकेट मंडळाला पडला होता.
भारतातून परतल्यावर या खेळाडूंना १४ दिवस एकांतवासामध्ये ठेवण्यात आले. या १४ दिवसांच्या विलगीकरणाच्या प्रक्रीयेत त्यांच्यावर डॉक्टरांचे बारीक लक्ष होते. आज त्यांच्या १४ दिवसांच्या विलगीकरणाची प्रक्रीया संपली. त्यानंतर संघातील सर्व खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत सर्व खेळाडू दोषी नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून इस्पितळात भरती आहे.
विषाणूची लागण झाल्यामुळे तिला संजय गांधी ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या इस्पितळात भरती केलं आहे. दरम्यान तिची पाचवी टेस्टही पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी तिची तब्येत ठीक असून घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.सध्या कनिकावर संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे उपचार सुरू आहेत. इस्पितळाचे डायरेक्टर आर.के. धीमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times