नवी दिल्ली: आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी या महिन्याच्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा लिलाव झाला. या लिलावात अनेक खेळाडूंना मोठी बोली लावण्यात आली. लिलावाच्या काही दिवसानंतर चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केलेल्या रॉबिन उथप्पाने आयपीएल संदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. या वर्षी चेन्नई सुपर किंग्जने त्याला दोन कोटी या बेस प्राईसला खरेदी केलेले होते.

वाचा-

आयपीएलमधील लिलावाबद्दल बोलताना उथप्पा म्हणाला, लिलावाची ही प्रक्रिया म्हणजे माझ्या सारख्याला जनावरासारखे वाटते. त्याने लिलावाची तुलना परीक्षा झाल्यानंतरच्या निकालाशी देखील केली. त्याच्या मते आयपीएलमध्ये लिलावात खेळाडूंना खरेदी करण्यापेक्षा ड्राफ्ट सिस्टिम सुरू करावी असा सल्ला देखील त्याने दिला.

वाचा-

लिलाव हा मला परीक्षेसारखा वाटतो. अशी परीक्षा जी तुम्ही खुप आधी दिली असते आणि फक्त निकालाची प्रतिक्षा करत असता. मला तर जनावरासारखे वाटते. हे बघून चांगले वाटत नाही. मला वाटते की भारताच असे होत असेल. कोणात्या कामगिरीवर चर्चा होणे वेगळी गोष्ट असते आणि एखादा खेळाडू किती रुपयांना विकला गेला याची चर्चा होने ही फार वेगळी गोष्ट ठरते, असे त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

वाचा-

तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही की ज्या खेळाडूंना कोणी विकत घेत नाही त्याची अवस्था काय होते. ज्यांना लिलावात कोणी बोली लावली नाही त्याच्या सोबत माझ्या संवेदना आहेत. अनेक वेळा यामुळे निराशा होते.सर्वांच्या भल्याचे हेच आहे की ड्राफ्ट सिस्टम हवी.

वाचा-

रॉबिन उथप्पाने आयपीएल २०२२सह करिअरचा अखेर करायची इच्छा व्यक्त केली. आयपीएलच्या गेल्या हंगामात त्याने क्वालिफायलमध्ये ४४ चेंडूत ६३ धावा केल्या होत्या. तर अंतिम सामन्यात कोलकाताविरुद्ध १५ चेंडूत ३१ धावांची खेळी केली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here