नवी दिल्ली: क्रिकेट विश्वातील महान खेळाडू आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि त्याच्या चाहत्यांसाठी २४ फेब्रुवारी म्हणजेच आजचा दिवस खूपच खास आहे. क्रिकेटच्या इतिहासात आजच्या या खास दिवसाची नोंद करण्यात आली आहे आणि सचिन तेंडुलकर या क्रिकेटच्या देवानं तो इतिहास घडवला आहे. सचिन तेंडुलकरनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये आजच्या दिवशीच २०१० साली पहिलं द्विशतक झळकावलं होतं. ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सचिनने नाबाद २०० धावांची अप्रतिम खेळी केली होती.

भारतानं १५३ धावांनी जिंकला होता सामना

महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं या सामन्यात ३ विकेट गमावून ४०१ धावा केल्या होत्या. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ २४८ धावांवरच गारद झाला होता. ४२.५ षटकेच दक्षिण आफ्रिकेला खेळता आली. एबी डिव्हिलियर्सनं नाबाद ११४ धावांची खेळी केली होती. श्रीसंत याने सर्वाधिक तीन गडी बाद केले होते. तर आशिष नेहरा, रविंद्र जाडेजा आणि युसूफ पठाण यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले होते.

Ind vs SL Dream11 Team Prediction: रोहितसोबत कोण येणार सलामीला? हे आहेत आजचे संभाव्य संघ

वनडेमध्ये २०० धावा करणारा पहिला खेळाडू

सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० धावा करून इतिहास रचला होता. ग्वाल्हेरमध्ये सचिननं जसं द्विशतक झळकावलं, तशी उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. स्टेडियममध्ये इतका गोंधळ आणि आवाज होता की, जवळच बसलेल्या व्यक्तींना एकमेकांचा आवाज ऐकू येत नव्हता. त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेल्या रवी शास्त्रींनीही कौतुकाचा वर्षाव सुरू केला होता. या ग्रहावरील पहिली व्यक्ती (पुरूष क्रिकेटपटू), ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० धावा केल्या आणि ती व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून, सचिन तेंडुलकर आहे, असं शास्त्री म्हणाले होते.

Ind vs SL : भारतीय भूमीवर ६ वर्षांपासून श्रीलंका विजयाच्या प्रतीक्षेत; का आहे भारताचे पारडे जड?

धोनीचीही कमाल

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने १४७ चेंडूंमध्ये २५ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने द्विशतक झळकावलं होतं. त्याचा स्ट्राइक रेट १३६ पेक्षा जास्त होता. दिनेश कार्तिकनेही ८५ चेंडूंमध्ये ७९ धावांची खेळी केली होती. तर त्यावेळचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने ३५ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावा ठोकल्या होत्या.

IND vs SL 1st T20 : टीम इंडियाचा विजयरथ श्रीलंका रोखणार का? कधी आणि कुठे पाहता येईल मॅच

द्विशतक भारतीयांना समर्पित

द्विशतक झळकावून विश्वविक्रमाला गवसणी घालणाऱ्या सचिननं सामना संपल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. हे द्विशतक मी सर्व भारतीयांना समर्पित करत आहे. गेल्या २० वर्षांत माझ्यासोबत जे पाठिशी ठामपणे उभे राहिले, त्यांना हे द्विशतक समर्पित करत आहे. जेव्हा द्विशतकाच्या जवळ पोहोचलो, त्यावेळी मी द्विशतक झळकावू शकतो, असं वाटलं, असं सचिन म्हणाला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here