लखनऊ : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० क्रिकेट प्रकारात आतापर्यंत कोणीही भारतीय संघाला पराभूत करू शकलेले नाही. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी (२४ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्ध यजमान भारतीय संघ पहिला टी-२० सामना खेळणार आहे.

भारताविरुद्ध श्रीलंकेची कामगिरीही फारशी चांगली राहिलेली नाही. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत एकूण २२ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी १४ सामन्यांत भारताने बाजी मारली आहे, तर ७ सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला आहे. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे भारताचे वर्चस्व एकतर्फी राहिले आहे. भारतात त्यांचा शेवटचा विजय २०१६ मध्ये झाला होता, जेव्हा त्यांनी ९ फेब्रुवारी रोजी पुण्यात भारताचा ५ गडी राखून पराभव केला होता.

श्रीलंकेसाठी चिंतेचा मुद्दा आहे त्यांचे फिरकी आक्रमण. अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा हा या मालिकेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ गेला, तेव्हा हसरंगाला कोरोनाची लागण झाली होती आणि अजूनही तो कोविड-१९ संसर्गातून बरा झालेला नाही. तसेच मिस्ट्री ऑफ स्पिनर महेश थिक्षाना देखील दुखापतींनी ग्रस्त असून तो खेळणार की नाही, याबाबत अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत.

हसरंगा आणि थेक्षाना यांच्या अनुपस्थितीत श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रवीण जयविक्रमा आणि जेफ्री वांडरसे यांची निवड केली जाऊ शकते. दुष्मंथा चमिरा, लाहिरू कुमारा आणि चमिका करुणारत्ने यांच्यामुळे फलंदाजी चांगली दिसत आहे.

Ind vs SL Dream11 Team Prediction: रोहितसोबत कोण येणार सलामीला? हे आहेत आजचे संभाव्य संघ
Virat Kohli : RCB चं कर्णधारपद का सोडलं? स्वतः विराट कोहलीनंच सांगितलं कारण

फलंदाजांना येणारे अपयश ही श्रीलंकेसमोरील आणखी एक डोकेदुखी आहे. यामुळेच त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय गोलंदाजीसमोर श्रीलंकन फलंदाजांचा निभाव लागेल का, त्यांना भारतीय खेळपट्ट्यांची साथ मिळेल की नाही, हे येणारा काळच दाखवेल.

कसे आहे खेळपट्टी आणि हवामान :
इकाना स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरली आहे. नाणेफेक जिंकून दोन्ही कर्णधार पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतील, कारण दुसऱ्या डावात रात्रीच्या सुमारास मैदानावर पडणारे दव महत्वाची भूमिका बजावताना दिसेल. तसेच तापमान २९ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे :-

भारत :
ऋतुराज गायकवाड, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.

श्रीलंका :
पथुम निसांका, दानुष्का गुणथिलका, कामिल मिशारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडीमल, चरित असलंका, दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, जेफ्री वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंथा चमिरा, लाहिरू कुमारा.

Ind vs SL, Lucknow Weather Update : भारत-श्रीलंका लखनऊमध्ये भिडणार; जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि हवामान

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here