या खेळीसह मिताली राजने भारतीय क्रिकेट संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले आहे. मिताली राज ही धावांचा पाठलाग करताना सर्वोत्तम सरासरी असणारी भारतीय खेळाडू ठरली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विजयाचा पाठलाग करताना मितालीची सरासरी १०९.०५ आहे. तिने या कालावधीत २१८१ धावा केल्या आहेत.
धोनीने धावांचा पाठलाग करताना १०२.७१ च्या सरासरीने २८७६ धावा केल्या आहेत, पण आता मिताली राजने त्याला मागे टाकले आहे. विराट कोहलीने विजयाचा पाठलाग करताना ९४.६६ च्या सरासरीने ५३९६ धावा केल्या आहेत. सरासरीच्या बाबतीत तिने धोनी आणि कोहलीला मागे टाकले आहे.
दुसरीकडे, स्मृती मंधाना ही आणखी एक भारतीय महिला क्रिकेटपटू देखील धावांचा पाठलाग करण्यात माहिर आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना तिने ६९.९४ च्या सरासरीने ११८९ धावा केल्या आहेत. माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने ६६.६० च्या सरासरीने १८६५ धावा केल्या आहेत. स्मृतीने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला. तिने ८४ चेंडूत ७१ धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times