मुंबई/ लखनऊ : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने इतिहास रचला आहे. एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. लखनऊमध्ये श्रीलंका विरुद्धच्या (India vs Sri Lanka) पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. भारतीय कर्णधार रोहितने न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल आणि भारताच्या विराट कोहलीलाही याबाबतीत मागे टाकलं आहे.

श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्मानं हा विक्रम केला आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माला हा पल्ला गाठण्यासाठी ३७ धावांची गरज होती. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्मानं या विक्रमाला गवसणी घातली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

मिताली राजने मोडला धोनीचा विक्रम; विराट कोहलीला टाकले मागे
India vs Sri Lanka, 1st T20I Live at Lucknow : भारताला दुसरा झटका, इशान किशन बाद

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

रोहित शर्मा – १२३ सामने, ३३०७ धावा
मार्टिन गप्टिल – ११२ सामने, ३२९९ धावा
विराट कोहली – ९७ सामने – ३२९६ धावा

रोहित शर्माची टी-२० कारकिर्द

सामने १२३
धावा – ३३०७
शतके – ४
अर्धशतके – २६
षटकार १५५

दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली या टी-२० मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे रोहित शर्माकडे या मालिकेत विक्रम मोडण्याची आणि धावांच्या बाबतीत अव्वल स्थानी पोहोचण्याची नामी संधी होती. रोहितनेही या संधीचे सोने केले आणि सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. तीन सामन्यांच्या टी २० मालिकेत रोहितने हा विक्रम आपल्या नावावर केला.

टीम इंडिया टाकणार हटके पाऊल, २ संघ केले तर…

भारत-श्रीलंका यांच्यात सर्वाधिक षटकार

टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ सर्वाधिक धावा नव्हे तर, रोहितने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सर्व टी-२० सामन्यांमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. रोहितने श्रीलंका विरुद्ध टी-२० सामन्यांत १५ षटकार मारले आहेत.

रोहित शर्मा – १५ षटकार
कुशल परेरा – १४ षटकार
शिखर धवन – १२ षटकार

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here