लखनऊ: धडाकेबाज फलंदाज इशान किशनची धमाकेदार ८९ धावांची खेळी, त्यानंतर श्रेयस अय्यरचे वादळी अर्धशतक आणि गोलंदाजांचा अचूक मारा या जोरावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं लखनऊत झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेला धूळ चारली आणि मोठा विजय साकारला. तत्पूर्वी भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना, अवघे २ गडी गमावून २०० धावांचं विशाल लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवलं होतं. ते लक्ष्य गाठताना श्रीलंकेच्या फलंदाजांची दमछाक झाली आणि पहिल्याच सामन्यात पाहुण्या संघाला पराभूत व्हावं लागलं. श्रीलंकेला भारताकडून ६२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

श्रीलंका संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खरं तर, प्रथम फलंदाजी करणारा संघ या मैदानावर जिंकला आहे, असा इतिहास असताना, श्रीलंकन कर्णधारानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि इशान किशन ही सलामीची जोडी मैदानात उतरली तीच मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने. रोहित शर्मा आणि इशाननं सावध सुरुवात केली. पण त्यानंतर इशाननं ‘टॉप गिअर’ टाकला आणि चौकार-षटकारांची आतषबाजी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. अवघ्या ३० चेंडूंमध्ये इशाननं आपलं अर्धशतक झळकावलं. तिच लय कायम ठेवत त्यानं ८९ धावा कुटल्या. तत्पूर्वी रोहित शर्मा हा ४४ धावांवर बाद झाला होता. तोपर्यंत सलामी जोडीनं १११ धावा केल्या होत्या. आधी रोहित शर्मा आणि त्यानंतर इशान किशन हा देखील बाद झाला. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यर यानं धुवाधार खेळी केली. त्यानं २८ चेंडूंत ५७ धावा कुटल्या आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. श्रेयसने ५ चौकार आणि दोन षटकार ठोकले. भारताने २० षटकांत २ बाद १९९ धावा करत, श्रीलंकेसमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवले.

Rohit Sharma : रोहित शर्माचा नवा विक्रम; रनमशीन विराट कोहलीला टाकलं मागे
मिताली राजने मोडला धोनीचा विक्रम; विराट कोहलीला टाकले मागे

२०० धावांचे मोठे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला शून्यावर पहिलाच धक्का बसला. निसांका शून्यावर बाद झाला. त्यानंतर अवघ्या १५ धावा असतानाच मिशाराच्या रुपानं दुसरा धक्का बसला. त्यानंतर श्रीलंकेचा संघ सावरला नाही. संघाच्या धावफलकावर ६० धावा असतानाच, अर्धा संघ तंबुत परतला होता. असलंकानं शेवटपर्यंत चांगली झुंज दिली. पण ती अपयशी ठरली. त्याने अर्धशतकी खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

टीम इंडिया टाकणार हटके पाऊल, २ संघ केले तर…

भारतीय फलंदाजांची कामगिरी

रोहित शर्मा – ४४ धावा, ३२ चेंडू, २ चौकार, १ षटकार
इशान किशन – ८९ धावा, ५६ चेंडू, १० चौकार, ३ षटकार
श्रेयस अय्यर – ५७ धावा, २८ चेंडू, ५ चौकार, २ षटकार
रवींद्र जाडेजा – ३ धावा, ४ चेंडू

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here