वाचा-
केंद्रीय करारातील ब गटात असलेल्या नियम ६.३ चे साहाने उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. या नियमानुसार, कोणत्याही खेळाडूने अधिकारी, खेळातील घडामोडी, तंत्रज्ञानाचा वापर, निवडीच्या बाबी किंवा खेळाशी संबंधित इतर कोणत्याही विषयाबाबत माध्यमांमध्ये कोणत्याही प्रकारची टिप्पणी करू नये, जी बीसीसीआयच्या मते खेळ, संघ किंवा बीसीसीआयच्या हिताचे नाही.
वाचा-
साहाने द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा आणि गांगुली यांच्याशी झालेल्या वैयक्तिक संभाषणाचा खुलासा केला होता. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी पीटीआयला सांगितले की, “केंद्रीय करार असलेला क्रिकेटपटू असूनही तो निवडीबाबतच्या गोष्टींविषयी का बोलला, हे बीसीसीआय रिद्धिमानला विचारेल, अशी शक्यता आहे.”
सध्या बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या यादीत समाविष्ट आहे. ब गटात साहाचा समावेश करण्यात आला असून त्यानुसार त्याला वर्षाला ३ कोटी रुपये मिळतात. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी साहाच्या जागी के.एस.भरतला संधी देण्यात आली. निवड न झाल्याने नाराज झालेल्या साहाने गांगुली आणि द्रविड यांच्याशी झालेले खाजगी बोलणे सार्वजनिक केले. त्यानंतर हा वाद सुरू झाला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times