नवी दिल्ली: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या भारतीय जनता पक्षाचा दिल्लीतील खासदार असलेला याने एक नवा आदर्श घालून दिला आहे. करोनाग्रस्तांसाठी आतापर्यंत तीन वेळा मदत केली होती. पण एवढ्यावरच तो थांबला नाही. मैदानावर चौकार आणि षटकार मारणाऱ्या गंभीरने आता करोनाविरुद्धच्या लढाईत मदतीचा चौकार मारला आहे.

वाचा-
गौतम गंभीरने करोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत प्रथम ५० लाख, १ कोटी आणि नंतर खासदार म्हणून मिळत असलेला दोन वर्षाचा पगार कोरनाग्रस्तांसाठी देण्याचे जाहीर केले होते. आता इतकी मदत केली म्हणून तो गप्प बसला नाही. गंभीरने करोना लढ्यातील प्रत्यक्ष मैदानावर काम करणाऱ्यांसाठी मोठी आणि अतिशय महत्त्वाची मदत केली आहे.

वाचा-
करोना लढाईत सर्वात मोठा धोका घेत आहेत ते वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी. अशा कर्मचाऱ्यांसाठी गंभीरने ५०० एन ९५ मास्क आणि १२५ पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विमेंट (PPT Kits) दिल्लीतील लाल बहादुर शास्त्री रुग्णालयाला दान दिले आहेत. याची माहिती खुद्द गंभीरने सोशल मीडियावरून दिली आहे.

वाचा-

मदतीची माहिती देताना गंभीरने जे लोक करोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे त्यांना इशारा दिला आहे. भारतात करोना रुग्णांची संख्या ३ हजारांच्या वर गेली आहे. तर मृतांची संख्या ९० इतकी झाली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here