मुंबई : एकमेकांचे शेजारी असलेले भारत आणि पाकिस्तान हे देश क्रिकेटच्या मैदानात मात्र कट्टर प्रतिस्पर्धी असतात. जेव्हा हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात, तेव्हा मैदानावरचा थरार जबरदस्त असतो, पण दोन्ही देशातील संबंध ताणले गेल्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाही.

वाचा-
ठेवायचाय हा विक्रम

या दोन्ही देशांतील क्रिकेट युद्ध फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्येच पाहायला मिळते. जगातील सर्वात महागड्या क्रिकेट लीग असलेल्या आयपीएल (IPL) मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. त्यामुळे पाकिस्तानने स्वत: आयपीएलच्या धर्तीवर पीएसएल (PSL) चे आयोजन करण्यास गेल्या काही वर्षांपासून सुरुवात केली आहे.

वाचा-

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघ २४ वर्षांनंतर पाकिस्तानात पोहोचला आहे. या दौऱ्याची सुरुवात ४ मार्चपासून कसोटी मालिकेने होत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानविरुद्ध तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू याने माध्यमांशी संवाद साधला आहे. इंडियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये कोणती लीग सर्वोत्तम आहे, असे विचारले असता उस्मानने आयपीएलला जगातील सर्वोत्तम लीग म्हटले आहे.

वाचा-

आयपीएलबद्दल बोलताना ख्वाजा म्हणाला की, ‘आयपीएल ही जगातील सर्वोत्तम लीग आहे, त्याची कोणत्याही लीगशी तुलना होऊ शकत नाही. आयपीएल ही एकमेव लीग आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडू इतर जगभरातील खेळाडूंसह खेळतात. यामुळे ही लीग जगातील सर्वोत्तम लीग ठरते. आयपीएल आणि पीएसएलमध्ये कोणतीही तुलना होऊ शकत नाही.

वाचा-

उस्मान ख्वाजा हा पाकिस्तानी वंशीय आहे. उस्मान ख्वाजाचा जन्म पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे झाला. कराचीही त्यांच्या आवडीच्या ठिकाणांपैकी एक आहे, कारण त्याचे नातेवाईक तेथे राहतात.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here