मोहाली: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराट कोहली त्याच्या करिअरमधील १००वी टेस्ट मॅच खेळत आहे. या निमित्ताने भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला खास गौरव केला. मोहालीत श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी सुरू होण्याआधी बीसीसीआयकडून मैदानावर एक छोटा कार्यक्रम झाला. यात भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने विराटला १००व्या कसोटी सामन्याची कॅप दिली. यावेळी मैदानावर विराट सोबत त्याची पत्नी अनुष्का देखील होती.

वाचा- लंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रोहितने असा निवडला संघ; पुजारा आणि अजिंक्यच्या जागी या दोघांना

विराटचे कौतुक करताना राहुल द्रविड म्हणाले, या गोष्टीचा तु हकदार आहेस, हे कमावलेली गोष्ट आहे. आणि जसे मी ड्रेसिंग रुममध्ये सांगितले की ही संख्या डबल कर. बोर्डाकडून झालेल्या सत्कारानंतर विराटने धन्यवाद मानले. खुप खुप धन्यवाद राहुल भाई. हा क्षण माझ्यासाठी फार खास आहे. येथे माझ्या सोबत पत्नी आहे. माझा भाऊ आणि बालपणीचे कोच मैदानात उपस्थित आहेत. क्रिकेट हा एक टीम गेम आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्या शिवाय हे शक्य नाही. मी बीसीसीआयचे आभार मानतो त्यांनी मला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. माझ्या १००व्या कसोटीची कॅप देण्यासाठी तुमच्यापेक्षा योग्य व्यक्ती असू शकत नाही. तुम्ही माझे बालपणीचे हिरो होता. माझ्याकडे आज देखील १५ वर्षाखालील संघातील तुमच्या सोबतचा फोटो आहे, अशा शब्दात विराटने राहुल द्रविड याचे आभार मानले.

वाचा- रहाणे-पुजारा यांना पुन्हा भारतीय संघात…; रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य

विराटने नेहमीच कसोटी क्रिकेटला महत्त्व दिले आहे. आज खुप क्रिकेट खेळले जाते. आम्ही तिनही फॉर्मेटमध्ये खेळतो. या शिवाय आयपीएलमध्ये खेळतो. माझी इच्छा आहे की पुढील पिढी माझ्याकडून हे शिकावे की मी या सर्वोत्तम क्रिकेट फॉर्मेटमध्ये १०० कसोटी सामने खेळले होते.

वाचा- १००व्या कसोटीत विराटला बसू शकतो झटका

वाचा- भारत विरुद्ध श्रीलंका पहिली कसोटी, पहिल्या दिवसाचे लाईव्ह अपडेट

भारतीय क्रिकेट इतिहासात १००वी कसोटी खेळणारा विराट हा १२वा खेळाडू ठरला आहे. याआधी कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रवीड, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी १००हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. भारताकडून सर्वाधिक कसोटी खेळण्याचा विक्रम सचिनच्या नावावर असून त्याने २०० सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील हा एक विक्रम आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here