मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामाला सुरुवात होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. काल रविवारी बीसीसीआयने स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. कोणता संघ, कोणाविरुद्ध कधी आणि कुठे खेळणार हे आता स्पष्ट झाले आहे. आयपीएलचे सर्वाधिक ५ विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या लढती कोणा सोबत आहेत याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

वाचा- जडेजाची ऐतिहासिक कामगिरी; क्रिकेटमध्ये ४९ वर्षानंतर झाली ऐतिहासिक कामगिरी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२२ मधील पहिली लढत ही २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. ही लढत सीसीआयच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल. मुंबईची दुसरी लढत राजस्थान रॉयल्स विरुद्ध डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. साखळी फेरीतील मुंबईची अखेरची लढत २१ मे रोजी होईल.

वाचा- IPL २०२२ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; पहिल्याच सामन्यात चेन्नई ‘या’ संघाशी भिडणार

मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२२चे वेळापत्रक (IPL 2022 Mumbai Indians Schedule)

२७ मार्च- विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स , ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३०
०२ एप्रिल- विरुद्ध राजस्थान रॉयल्स, डीवाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३०
०६ एप्रिल- विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, एमसीए स्टेडियम, रात्री ७.३०
१३ एप्रिल- विरुद्ध पंजाब किंग्ज, एमसीए स्टेडियम, रात्री ७.३०
२१ एप्रिल- विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, डीवाय पाटील स्टेडियम, रात्री ७.३०
२४ एप्रिल- विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, वानखेडे स्टेडिमय, रात्री ७.३०
३० एप्रिल- विरुद्ध राजस्थान रॉयल्स, डीवाय पाटील स्टेडियम, रात्री ७.३०
०६ मे- विरुद्ध अहमदाबाद टायटन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, रात्री ७.३०
०९ मे- विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स , डीवाय पाटील स्टेडियम, रात्री ७.३०
१२ मे- विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, वानखेडे स्टेडियम, रात्री ७.३०
१७ मे- विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, रात्री ७.३०
२१ मे- विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डीवाय पाटील स्टेडियम, रात्री ७.३०

वाचा- Video : रिचा घोषचा अफलातून कॅच; स्टंपमागे अशी कामगिरी करणारी पहिली यष्टीरक्षक

मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षी विजेतेपद मिळवली आहेत. पण गेल्या वर्ष त्यांना क्वॉलिफायलमध्ये प्रवेश करता आला नव्हता. आता या वर्षी देखील विजेतेपदाच्या मुख्य दावेदारांमध्ये मुंबई इंडियन्सचा समावेश आहे. मेगा लिलावात मुंबईने ईशान किशनवर सर्वात मोठी बोली लावली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here