आज ५ एप्रिल. आजच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री नऊ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विजेची उपकरणे बंद करा आणि दिवे, मेणबत्ती किंवा मोबाईलचा फ्लॅश ऑन करा, असे आवाहन भारतीयांना केले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या गोष्टींला पाठिंबा देत लोकांना याबाबत आवाहन केले आहे.

याबाबत कोहलीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कोहली म्हणाला आहे की, ” स्टेडियममधील शक्ती ही चाहत्यांवर अवलंबून असते. भारताचे स्पिरीट हे देशवासियांवर अवलंबून आहे. भारतीयांमध्ये यकशी एकजूट आहे हे आज रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावून दाखवून द्या. आपला जीव वाचवणाऱ्यांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत, हे सर्वांना दाखवून द्या.

रोहितने याबाबत सांगितले की, ” हा आयुष्याचा कसोटी सामना आपल्या सर्वांना जिंकायचा आहे. त्यासाठी आपण किती कणखर आहोत, आपल्यामध्ये किती एकजूट आहे आणि आपण सर्व मिळून या गोष्टीचा सामना कसा करत आहोत, हे आज ९ वाजता दिवे लावून दाखवून द्या.”

करोनाच्या जागतिक साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे, त्यासाठी मला आपल्या सर्वांची ९ मिनिटे हवी आहेत, असे सांगत येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता केवळ ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे,
किवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहन जनतेला केले होते.

यांनी आज सकाळी ९ वाजता प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदेशात लोकांना हे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘रविवारी ५ एप्रिलला आपल्याला करोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून प्रकाशाची शक्ती दाखवून द्यायची आहे. यासाठी ५ एप्रिलला १३० कोटी जनतेच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे. ५ एप्रिलला रात्री ९ वाजता मी आपले फक्त ९ मिनिटे हवी आहेत. या वेळी तुम्ही तुमच्या घरातील सर्व लाइट्स बंद करा. घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत या आणि मेणबत्ती,
किंवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा. हे ९ मिनिटे करा’

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here