गावस्कर यांनी आपल्या स्तंभलेखातून मल्होत्रा यांच्या वक्तव्यावर ताशेरे ओढले आहेत. ‘मिड डे’मधील स्तंभलेखात गावस्कर म्हणाले की, ” जर खेळाडू खेळलाच नाही तर त्याचे मानधन मिळत नाही. जगभरात सर्वच खेळांच्या स्पर्धांमध्ये असेच पाहायला मिळते. पण भारतीय क्रिकेटर्स संघटनेच्या अध्यक्षांनी खेळाडूंचा पगार कापण्याचे केलेले वक्तव्य हे मला मनोरंजक वाटत आहे.”
ते आपल्या स्तंभात पुढे म्हणाले आहेत की, ” मल्होत्रा यांनी केलेले वक्तव्य खेळाडूंच्या बाजूचे वाटत नाही. पण सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे खेळाडू या संघटनेचा भाग नाहीत. त्यामुळे त्यांनी कोणाच्यावतीने हे वक्तव्य केले आहे.”
करोना व्हायरसचा धक्का क्रीडा जगताला बसला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी आयपीएल सध्या पुढे ढकलली गेली आहे. पण जर आयपीएल रद्द करण्यात आली तर खेळाडूंना ठरवलेले मानधन मिळणार नाही, असे समजते आहे.
कसे मिळते खेळाडूंना मानधनआयपीएलमुळे खेळाडू करोडपती झाले. कारण त्यांच्यावर करोडोंची बोली लावून त्यांना संघ मालकांनी आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. पण या खेळाडूंना त्यांचे पैसे एकरकमी मिळत नाहीत. आयपीएल सुरु होण्याच्या आठवड्याभरापूर्वी त्यांना बोली लागलेल्या रक्कमेच्या १५ टक्के एवढी रक्कम दिली जाते. आयपीएल सुरु असताना खेळाडूंना ६५ टक्के एवढी रक्कम दिली जाते तर आयपीएल संपल्यावर खेळाडूंना उर्वरीत रक्कम दिली जाते.
खेळाडूचे कसे होणार नुकसानभारतीय क्रिकेटर्स संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी सांगितले की, ” सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये आयपीएल होणार की नाही, याबाबत काहीच सांगू शकत नाही. पण आयपीएल जर रद्द झाली तर त्याचा फटका संघ मालकांना बसणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआय आणि प्रसारण करणाऱ्या कंपनीलाही मोठा फटका बसणार आहे. जर आयपीएल झाली नाही तर खेळाडूंनाही त्यांचे पूर्ण मानधन मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. यावेळी खेळाडूंच्या मानधनात कपातही केली जाऊ शकते.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times