ICC World Test Championship Points Table 2021-2023 : भारतीय संघाने दोन सामन्याच्या कोसटी मालिकेत श्रीलंकेच्या संघाचा दारुण परभाव केला. दोन सामन्याची मालिका भारताने 2-0 च्या फराकाने जिंकली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गुणतालिका जाहीर केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत इंग्लंडचा संघ तळाशी आहे.

पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचे Percentage of points 77.77 टक्के इतके आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पाकिस्तान संघाचे 66.66 टक्के इतके आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचे     Percentage of points 60 टक्के आहेत. भारताचे Percentage of points 58.33 टक्के इतके आहेत. तळाशी असणाऱ्या इंग्लंड संघाचे Percentage of points 11.67 टक्के इतके आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघाची दुसरी तर पाकिस्तान संघाची तिसरी मालिका सुरु आहे.  ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत चार आणि पाकिस्तान संघाने तीन विजय मिळवले आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा एकही पराभव झालेला नाही. पाकिस्तानला एका पराभवाला सामोरं जावे लागलेय. तर भारतीय संघाचे तीन पराभव झाले आहेत. तळाशी असणाऱ्या इंग्लंड संघाला एक विजय मिळवता आला आहे. तर सहा पराभवाचा सामना करावा लागलाय. गतविजेत्या न्यूझीलंडचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या संघाने दोन सामने जिंकले आहेत. तर तीन सामने गमावेल आहेत. भारतीय संघाला पेन्ल्टी ओव्हर्समुळे तीन गुणांचा फटका बसला आहे. षटकांची गती न राखल्यामुळे भारतीय संघाचे तीन गुण कपात करण्यात आले आहेत.

  

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अश्विनचा विक्रम –

श्रीलंकाविरोधात झालेल्या दोन कसोटी सामन्यात अश्विनने 12 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन आठव्या क्रमांकावर पोहचला आहे. कसोटीत अश्विनच्या नावावर 442 विकेटची नोंद आहे. हा कारनामा करतानाच अश्विनने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 100 विकेटही पूर्ण केल्या आहेत. असा पराक्रम करणारा अश्विन जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. कमिन्सच्या नावावर 93 विकेट आहेत. त्यानंतर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉडचा क्रमांक लागतो. ब्रॉडने 83 विकेट घेतल्या आहे. या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचव्या क्रमांकावर आहे. बुमराहने 74 विकेट घेतल्या आहेत. 
 
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज – 
100- आर अश्विन
93- पॅट कमिन्स
83- स्टुअर्ट ब्रॉड
80- टिम साउदी
74- जसप्रीत बुमराह
74- नाथन लायनsports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here