यंदाच्या आयपीएलच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला सर्वाधिक १५.५ कोटी रुपयांची बोली लागली होती. कोलकाता नाइट रायडर्सने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते. त्यामुळे जर कमिन्स आयपीएल खेळला नाही तर त्याला एवढ्या मोठ्या रकमेवर पाणी सोडावे लागणार आहे.
वाचा-
याबाबत कमिन्स म्हणाला की, ” गेल्या दोन वर्षांपासून आम्ही ट्वेन्टी-२० विश्वचषकाची तयारी करत आहोत. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही सर्वात मोठी स्पर्धा असेल. ऑस्ट्रेलियाने २०१५ साली विश्वचषक जिंकला होता. पण अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मला मिळली नव्हती. पण यावेळी मी विश्वचषकासाठी चांगलीच कंबर कसलेली आहे.”
वाचा-
तो पुढे म्हणाला की, ” सध्याच्या घडीला असलेले वातावरण कधी बदलेल, हे सांगता येत नाही. पण हे वातावरण लवकर बदलायला हवे आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन व्हायला हवे. जर मी पैशांचा भुकेला असतो तर मी आयपीएलचे आयोजन व्हायला हवे, असे म्हटले असते. पण मी नेहमीच आयपीएलपेक्षा विश्वचषकाला पहिली पसंती देईन.”
करोना व्हायरसमुळे भारतातील काही स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत, तर यंदाची आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आता १५ एप्रिलला आयपीएलचा निर्णय होईल, असे म्हटले जात आहे. पण अजूनपर्यंत ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हा विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाने सहा महिने आंतरराष्ट्रीय विमानांना प्रवेश देणा नाही, असेही म्हटलेले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times