भारतीय संघाने आतापर्यंत बरेच विजय मिळवले आहेत. सध्या झालेला न्यूझीलंडचा दौर सोडला, तर भारताने चांगली कामगिरी केलेली आहे. भारतीय संघ या वर्षी ऑस्ट्रेलिच्या दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी भारतीय संघ २०१८ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातील विजयाबाबत पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी भारतीय संघाला डिवचले आहे.
भारतीय संघ २०१८ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने चांगली कामगिरी करत विजय मिळवला होता. भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. पण या विजयाचे श्रेय पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचे संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी भारतीय संघाला दिलेले नाही.
याबाबत वकार यांनी सांगितले की, ” भारताने २०१८ साली झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात कसोटी मालिका जिंकली होती. या मालिकेत स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोन्ही खेळाडू नव्हते. दक्षिण आफ्रिकेत चेंडूशी छेडछाड केल्यामुळे या दोघांवरही एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जर हे दोघे ऑस्ट्रेलियाच्या संघात असते तर कदाचित निकाल वेगळा लागण्याची शक्यता होती.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times