भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ५ एप्रिलला घरातील लाइट्स बंद करून रात्री ९ वाजता देशवासियांना दिवे, मेणबत्ती किंवा मोबाईल टॉर्च लावायला सांगितले होते. पण काही भारतीयांनी तर यावेळी जसे काही करोनाला पराभूत केले आहे, या आविर्भावात फटाके फोडून आनंद साजरा केला. यावर फटाक्यांवर आता भारताचे क्रिकेटपटू चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत.

रविवारी काही लोकांनी घरातील लाइट्स बंद करून दिवे लावले. पण काही उत्साही लोकांनी रस्त्यावर एकत्र जमून आनंद साजरा केला. यावेळी काही जणांनी रस्त्यावर उतरून फटाके फोडल्याचेही पाहायला मिळाले. काही जणांनी तर एवढे फटके लावले की त्या ठिकाणी अग्नीतांडवही पाहायला मिळाला.

या फटाके फोडणाऱ्या लोकांवर भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा खासदार गौतम गंभीर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. ही गोष्ट आपण सारे एकत्र आहोत, यासाठी होती. यावेळी फटके फोडण्यासारखे काय होते, असे म्हणत गंभीर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला आहे.

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तर फटाके लावल्यावर कशी मोठी लागली, हे दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओवर हरभजनने कमेंटही केली आहे. हरभजन म्हणाला की, ” आपण एखादवेळेस करोनापासून वाचू, पण या मुर्ख लोकांपासून आपल्याला कोण वाचवणार.”

करोनाच्या जागतिक साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे, त्यासाठी मला आपल्या सर्वांची ९ मिनिटे हवी आहेत, असे सांगत येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता केवळ ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती किवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहन जनतेला केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदेशात लोकांना हे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘रविवारी ५ एप्रिलला आपल्याला करोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून प्रकाशाची शक्ती दाखवून द्यायची आहे. यासाठी ५ एप्रिलला १३० कोटी जनतेच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे. ५ एप्रिलला रात्री ९ वाजता मी आपले फक्त ९ मिनिटे हवी आहेत. या वेळी तुम्ही तुमच्या घरातील सर्व लाइट्स बंद करा. घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत या आणि मेणबत्ती, दिवा किंवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा. हे ९ मिनिटे करा’

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here