भारताचा कर्णधार विराट कोहली हा चांगलाच आक्रमक असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण कोहलीपेक्षाही आक्रमक खेळाडू क्रिकेट विश्वात आहेत, पण तरीही ते कधी कोहलीशी पंगा घेताना दिसत नाही. या गोष्टीचे कारण मैदानातने नसून मैदानाबाहेरचे असल्याचे आता पुढे आले आहे.

एक कर्णधार म्हणून कोहली जास्तच उत्साही आहे. कधी एखादा खेळाडू बाद झाला तर त्यावेळी तो आक्रमक वर्तन करत असल्याचे पाहायला मिळते. पण कोहली खेळत असताना किंवा तो बाद झाल्यावर त्याच्याबाबत कोणीही गैरवर्तन करत नाही किंवा शाब्दिक हल्लाबोल करत नाही.

क्रिकेट विश्वात सर्वात जास्त आक्रमक खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. आक्रमकता ही त्यांच्या रक्तातच भिनल्याचे म्हटले जाते. पण ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही कोहलीशी पंगा घेताना दिसत नाही. हे नेमके का होते, याचे उत्तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने सांगितले आहे. यावळी क्लार्कने जे कारण दिलेले आहे तेच वास्तव असल्याचे दिसत आहे. क्लार्कने काही खेळाडूंशी यावर चर्चा केली आणि त्यानंतर कोहलीबाबतचे विधान केलेले आहे. त्यामुळे त्याच्या या विधानामध्ये सत्यता असल्याचे म्हटले जात आहे.

याबाबत क्लार्क म्हणाला की, ” सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया किंवा अन्य कोणत्याही देशाचे खेळाडू कोहलीशी पंगा घेताना दिसत नाही. या गोष्टीचे कारण आहे ते म्हणजे आयपीएल. जर कोहलीशी पंगा घेतला तर आयपीएलमध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही किंवा जास्त मानधन मिळणार नाही, तही धास्ती खेळाडूंना कुठेतरी नक्कीच वाटत आहे. त्यामुळे ते कोहलीशी पंगा घेताना दिसत नाही. काही खेळाडूंनी तर आम्हाला आयपीएल खेळायचे आहे. कोहलीच्या संघात राहून आम्हाला चांगले मानधन कमवायचे आहे, असे थेट सांगितले आहे. सध्याच्या घडीला आयपीएलमुळे भारत ही क्रिकेट विश्वातील महासत्ता झालेली आहे. त्यामुळे कोहलीशी पंगा म्हणजे भारताशीही पंगा, असे काही खेळाडूंना वाटते. त्यामुळे सध्याच्या घडीला कोणत्याही देशाचे खेळाडू कोहलीवर मैदानात हल्लाबोल करताना दिसत नाहीत.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here