करोना व्हायरसचा फटका संपूर्ण जगाला बसलेला आहे. त्यामुळे सर्व देशांत चिंतेचे वातावरण आहे. काही क्रीडा स्पर्धा रद्द केल्या गेल्या आहेत, तर काही स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. पण क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र एक गूड न्यूज आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार होता. पण हा दौरा करोना व्हायरसमुळे रद्द होईल, असे म्हटले जात आहे. कारण ऑस्ट्रेलियाने सहा महिने आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा दौरा जर होणार नसेल तर ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा कशी होणार, याची चिंता क्रिकेट चाहत्यांना होती. पण त्यांच्यासाठी आता एक गूड न्यूज समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेबाबत आतापर्यंत कोणतेच अपडेट आले नव्हते. पण आज ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजन समितीमधील एका व्यक्तीने सकारात्मक माहिती दिली आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजन समितीमधील मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉक्ले यांनी सांगितले की, ” विश्वचषक खेळवण्यासाठी परिस्थिती कशी चांगली होईल याचा विचार आम्ही करत आहोत. जेणेकरून आम्हाला विश्वचषक नियोजित खेळेत खेळवता येईल. विश्वचषक निजोयित वेळेत कसा होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे विश्वचषकाचे आयोजन ठरलेल्या वेळेत होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

ते पुढे म्हणाले की, ” सध्याच्या घडीला आम्ही आयसीसी आणि सर्व देशांच्या संपर्कात आहोत. जर काही बदल करायचा असेल तर आम्ही त्यांना पूर्व सुचना नक्कीच देऊ. सध्याच्या घडीला विश्वचषकासाठी सात महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे आम्हाला कमी वेळात जास्त काम करायचे आहे. ऑस्ट्रेलियातील चाहत्यांमध्ये या विश्चवचषकाबाबत कमालीची उत्सुकता आहे. आयसीसीनेदेखील यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करण्याचा सध्यातरी आमचा कोणताही मानस नाही. त्यामुळे आयसीसीकडून आम्हाला पाठिंबा मिळाला आहे. आता ही स्पर्धा नियोजित वेळेत यशस्वी कशी करायची, हे आव्हान कमी दिवसांत आम्हाला पेलवायचे आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here