गावस्कर यांनी मंगळवारी राज्य आणि केंद्र सरकार यांना आर्थिक मदत केली आहे. पण गावस्कर यांनी हे गुप्त दान केले हे, त्यांनी याबाबत कुठेही वाच्यता केलेली नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना गावस्कर यांनी नेमके किती रुपये देन केले, हे समजू शकलेले नाही.
गावस्कर यांच्या जवळील काही व्यक्तींनी याबाबत माहिती दिली आहे. गावस्कर यांनी एकूण ५९ लाख रुपयांची मदत केली आहे. यापैकी गावस्कर यांनी केंद्राला ३५ लाख रुपयांची मदत केली आहे, तर राज्य सरकारला २४ लाख रुपयांची मदत केली आहे.
करोना व्हायरसला रोखण्यासाठी भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग आता पुढे सरसावला आहे. करोना व्हायरसला पळवण्यासाठी सरकार काही पावले उचलते आहे. आता सरकारला मदत करण्यासाठी युवराज पुढे सरसावला आहे. युवराजने ५० लाख रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यक निधीला केली आहे.
हरभजन करतोय ५ हजार कुटुंबियांना मदतसध्याच्या घडीला भारतामध्ये २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बल घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पण या गरजूंना अन्न-धान्य मिळावे यासाठी भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग पुढे सरसावला आहे. तब्बल पाच हजार कुटुंबियांना तो अन्न-धान्य पुरवत असल्याचे दिसत आहे.
पंजाबमधील जालंधर येथे सध्या बिकट अवस्था आहे. कारण बहुतांशी लोकांना अन्न-धान्याचा पुरवठा झालेला नाही आणि त्यामुळेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. पण या कुटुंबियांसाठी हरभजन हा देवदूत ठरला आहे. जालंधर येथील पाच हजार कुटुंबियांच्या अन्न-धान्याच्या प्रश्न हरभजनने सोडवला आहे.
याबाबत हरभजन म्हणाला की, ” सध्याच्या घडीला काही कुटुंबियापुढे अन्न-धान्याचा प्रश्न बिकट होत चालला होता. या गरजू लोकांना मदत करण्यासाठी मी आणि पत्नी गीता यांनी पुढाकार घेतला आहे. जालंधर येथील पाच हजार लोकांना अन्न-धान्य कसं मिळेल, याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. या पाच हजार कुटुंबियांचा अन्न-धान्याचा प्रश्न आम्ही तुर्तास सोडवला आहे. यापुढेही असे काम करण्याची ताकद मला मिळो, हीच प्रार्थना आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times