IPL 2022 : मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने रविवारी झालेल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सवर दमदार विजय साकारला होता. पण या विजयानंतर आता दिल्लीच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण दिल्लीच्या एका मॅचविनर खेळाडूला आता मोठी दुखापत झाली आहे. त्यामुळे हा खेळाडू आता आयपीएलच्या सामन्यांना मुकणार असल्याचेच दिसत आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतून स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श बाहेर पडला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या काळजीत भर पडली आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने मार्शसाठी ६.५ कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले होते.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (PAK vs AUS) मंगळवारपासून (२९ मार्च) सुरू होणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सराव सत्रादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. पत्रकारांशी बोलताना संघाचा कर्णधार आरोन फिंचने मार्शच्या दुखापतीचा खुलासा केला आहे.

फिंचने सांगितले की, ‘क्षेत्ररक्षणाचा सराव करताना मार्शला हिप-फ्लेक्सर दुखापत झाली आहे. तूर्तास आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल, पण मला वाटत नाही की, तो या मालिकेसाठी उपलब्ध असेल. क्षेत्ररक्षणादरम्यान त्याला ही दुखापत झाली. एका हाताने चेंडू उचलण्यासाठी तो पटकन खाली वाकला आणि फेकताना त्याला वेदना जाणवू लागल्या.’

पाकिस्तानविरुद्धची मर्यादित षटकांची मालिका संपल्यानंतर तो ६ एप्रिल रोजी दिल्ली संघात सहभागी होणार होता, पण तो दिल्लीच्या कॅम्पमध्ये कधी दाखल होईल, हे आता त्याच्या दुखापतीच्या स्थितीवर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर ५ एप्रिलला एकमेव टी-२० सामना खेळवला जाणार आहे. मार्शने गेल्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६२७ धावा करून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा ऑस्ट्रेलियन विक्रम प्रस्थापित केला. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही तो संघाच्या विजयाचा हिरो ठरला होता.

मार्शला दुखापतीचा मोठा इतिहास आहे. त्याने २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, पण त्याने आतापर्यंत फक्त २१ सामने खेळले आहेत. तो २०२० मध्ये सनरायझर्स हैदराबादचा भाग राहिला होता, पण पहिल्याच सामन्यात दुखापतीमुळे तो लीगमधून बाहेर पडला होता.

आयपीएल २०२२

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here