सध्याच्या घडीला काही क्रिकेटपटू आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ व्यतित करत आहेत. तर काही खेळाडू घरातल्या घरात सरावाला प्राधान्य देत आहेत. काही खेळाडू तर चक्क रस्त्यावर गरजू लोकांना मदत करण्यासाठी उतरले आहेत, तर काही आपल्या घरातील काम करण्यात मग्न आहेत. पण या लॉकडाऊनचा बराच जणांना कंटाळा आलेला आहे.
टेनिस विश्वातील सुंदरी म्हणून ओळखली जाणारी मारिया शारापोव्हादेखील लॉकडाऊनला कंटाळली आहे. त्यामुळे आता तिने आपल्या दूरध्वनी क्रमांक ट्विटरवर शेअर केला आहे. हा नंबर शेअर केल्यावर फक्त ४० तासांमध्ये तब्बल २२ लाख लोकांनी तिच्याबरोबर संपर्क साधला असल्याचे समोर आले आहे.
शारापोव्हाने आपला दूरध्वनी क्रमांक ट्विटरवर शेअर केला आहे. हा क्रमांक शेअर करताना तिने म्हटले आहे की, ” तुमचे लॉकडाऊनमधील अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. त्याचबरोबर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा.” त्यामुळे सध्याच्या घडीला शारापोव्हाचा फोन चांगला खणाणत असल्याचे दिसत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times