Virendra Sehwag : वीरेंद्र सेहवागचं नाव जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाच्या स्फोटक फलंदाजांपैकी एक म्हणून कायम घेतलं जातं. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक त्रिशतकं झळकावण्यात सेहवाग सर्वात पुढे आहे. दरम्यान सेहवाग सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं आपण पाहतो. आता देखील त्याने सोशल मीडियावर एक किस्सा लिहित 29 मार्च ही तारीख त्याच्यासाठी का खास आहे? हे सांगितलं आहे.

सेहवागने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, ‘आज म्हणजेच 29 मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध मुल्तान टेस्टमध्ये त्याने सर्वात पहिलं त्रिशतक झळकावलं होतं. तर याच तारखेला एकदा दक्षिण आफ्रीकेविरुद्ध तो 319 धावा करुन बाद झाला होता. विशेष म्हणजे ही तारीख क्रिकेट व्यतीरिक्तही त्याच्यासाठी खास आहे. कारण त्याने घेतलेल्या एका कारचा नंबरही त्याला अनायसे 2903 असाच मिळाल्याचं त्यानं यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे 29 मार्च या तारखेची त्याच्या आयुष्यात खास जागा आहे. त्याने ही पोस्ट लिहिताना सुरुवातीला मिश्किलपणे ‘तारीख मे क्या रखा है?’ असंही म्हटलं आहे.  


 

भारताचा स्फोटक फलंदाज

वीरेंद्र सेहवाग भारताकडून दोन त्रिशतकं झळकावणारा एकमेव फलंदाज आहे. सेहवागशिवाय जगात केवळ तीन फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं झळकावली आहेत. यामध्ये सर डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा आणि ख्रिस गेल या फलंदाजाचा समावेश आहे. पण सर्वात जलदगतीने त्रिशतकं सेहवागनेच झळकावलं आहे. सेहवागने दक्षिण आफ्रीकेविरुद्ध 278 चेंडूत त्रिशतक ठोकलं होतं.

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here