करोना व्हायरसचा मोठा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. त्यामुळे सर्च स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. सध्याच्या घडीला एकही स्पर्धा सुरु नाही. त्यामुळे खेळाडू सध्या घरी बसून आहेत. या परिस्थितीमध्ये हॉकी इंडियाने या लॉकडाऊनमध्ये एक मोठा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनमध्ये खेळाडूंना घरबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. हॉकी हा एक सांघिक खेळ आहे. त्यामुळे या खेळाचा सराव एकत्रितपणे करावा लागतो. मार्च ते जून या कालामधीमध्ये भारताच्या हॉकी संघांच्या विविध सहा आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार होत्या. या स्पर्धा जर्मनी, इंग्लंड, कोरिया, बांगलादेश, नेदरलँड्स या देशांमध्ये होणार होत्या.

भारताच्या विविध हॉकी संघांचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम हॉकी इंडियाने पाहिले आहेत. त्याचबरोबर सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. हे सारे पाहता हॉकी इंडियाने जूनपर्यंतच्या सर्व स्पर्धा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

हॉकी इंडियाचे कार्यकारी संचालक आर के श्रीवास्तव यांनी सांगितले की, ” सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्या एप्रिल ते जून या कालावधीमध्ये होणार होत्या, त्या आम्ही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आम्ही आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला कळवले आहे, त्याचबरोबर आशियाई हॉकी संघटनेलाही याबाबत माहिती दिली आहे. जेव्हा आम्हाला पुढच्या तारखा या दोन संघटना पाठवतील तेव्हा आम्ही देशांतील हॉकीशी निगडीत संघटनांना आणि खेळाडूंना सांगू.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here