मुंबई: एविन लुईस आणि क्विंटन डीकॉक यांच्या अर्धशतकाच्या जारोवर लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलच्या १५व्या हंगामात गुरुवारी झालेल्या सामन्यात गतविजेते चेन्नई सुपर किंग्जचा ६ विकेटनी पराभव केला. या हंगामातील लखनौचा हा पहिलाच विजय ठरला. चेन्नईने दिलेल्या २११ धावांचा पाठलाग करताना लखनौने ६ विकेट आणइ ३ चेंडू राखून विजय मिळवला. लुईसने २३ चेंडूत ३ षटकार, ६ चौकारांसह नाबाद ५५ तर डीकॉकने ६१ धावांची खेळी केली. आयपीएलच्या कोणत्याही हंगामात पहिल्या दोन लढती गमवण्याची चेन्नई संघाची ही पहिलीच वेळ आहे.

वाचा- धोनीच्या ६ चेंडूत १६ धावा आणि झाला विक्रम; टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा

चेन्नईच्या या पराभवामुळे गुणतक्त्यात ते आठव्या स्थानावर आहेत. त्याच्या मागे मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ आहेत. मुंबई आणि हैदराबदाने एकच लढत गमावली असली तरी त्यांचे नेट रनरेट चेन्नईपेक्षा कमी आहे. त्यामुळे ते नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. चेन्नईवरील विजयाने लखनौ सहाव्या स्थानावर आहेत. राजस्थानचा संघ पहिल्या सामन्यातील दणदणीत विजयासह अव्वल स्थानावर, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या, पंजाब किंग्ज तिसऱ्या, गुजराज टायटन्स चौथ्या, कोलकाता नाईट रायडर्स पाचव्या स्थानावर आहेत. स्पर्धेत आतापर्यंत कोलकाता, लखनौ, बेंगळुरू, चेन्नई या संघांचे प्रत्येकी २ लढती झाल्या आहेत.

वाचा- ‘घरी बसून IPL बघावं लागतंय, स्वत:चा खूप राग येतोय’

आयपीएल ताजा गुणतक्ता

वाचा- ३ वर्ष IPLमधील एकाही संघाने भाव दिला नाही; आता संधी मिळतात सर्वाची झोप उडवली

चेन्नईने प्रथम फलंदाजी करत २१० धावा केल्या होत्या. चेन्नईकडून सलामीवीर रॉबिन उथप्पा (५०)आणि शिवम दुबे (४९) यांनी धमाकेदार फलंदाजी केली. त्यांना मोईन अली, अंबाती रायडू यांनी सुरेख साथ दिली. उत्तरादाखल लखनौला डी कॉक आणि केएल राहुल यांनी शानदार सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावा केल्या. त्यानंतर एविन लुईसच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी ३ चेंडू राखून विजय साकारला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here