नवी मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीला सुरूवात झाली आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईची या हंगामातील ही दुसरी लढत असून पहिल्या लढतीत त्यांचा दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव झाला होता. आता या लढतीत विजय मिळून खाते उघडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

वाचा- २०० धावा करून ही विजय मिळत नाही; चॅम्पियन संघाचे प्रशिक्षक झाले हतबल

दिल्लीविरुद्ध झालेल्या पहिल्या लढतीत मुंबईला रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी चांगली सुरूवात करून दिली होती. पण मधळ्या फळीतील फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले होते. या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव फिट आहे आणि तो निवडीसाठी उपलब्ध आहे असे वृत्त होते. पण प्रत्यक्षात रोहित नाणेफेकीसाठी आल्यावर चाहत्यांना धक्का बसला. कारण मुंबईने संघात कोणताही बदल केलेला नाही. पहिल्या सामन्यात जो संघ होता तोच कायम ठेवण्यात आला आहे.

वाचा- क्रिकेटमध्ये असे कधीच झाले नाही; कर्णधाराच्या एका शतकाने इतिहास घडवला

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन,अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, कारयन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बसिल थंपी

राजस्थान रॉयल्सने या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. कुल्टर-नाईलच्या जागी नवदीप सैनीला संधी दिली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here