नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट चाहत्यांची एकेकाळी अशी अवस्था होती की, मास्टर ब्लास्टर बाद झाली की सर्व जण टीव्ही बंद करायचे. कारण सचिन हाच एकमेव आधार वाटायचा सर्वांना. सचिन सर्वोत्तम क्रिकेटपटू का आहे हे स्वतंत्रपणे सांगण्याची गरज नाही. त्याची आकडेवारीच सर्व काही सांगते. इतक नव्हे तर आजी-माजी क्रिकेटपटूंनी अनेक वेळा सचिन सर्वोत्तम फलंदाज का आहे सांगितले आहे.

वाचा-
सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बरीच वर्षे झाली असली तरी सध्या भारतीय क्रिकेट संघात खेळणारे असे अनेक खेळाडू आहेत जे सचिनचा खेळ पाहून मोठे झाले आहेत. असाच एक खेळाडू आहे ज्याने सचिन बद्दलचा एक प्रसंग सांगितला आहे.

cricbuzz या क्रिकेट वेबसाइटच्या वेब सिरीजमध्ये बोलोताना भारताचा क्रिकेटपटू हनुमा विराही याने सचिन आणि त्याची एक भावूक गोष्टी सांगितली. सचिनला खेळताना पाहत मी मोठा झाला आणि क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. ९०च्या दशकात जेव्हा सचिन क्रिकेटचे मैदान गाजवत होतो तेव्हा अनेक खेळाडू त्याला पाहून मोठे होत होते. सचिनची आठवण सांगताना हनुमा म्हणाला, तेव्हा सचिन बाद व्हायचा तेव्हा मी रडायचो आणि टीव्ही बंद करून द्यायचो.

वाचा-
काही दिवसांपूर्वी हनुमा विहारीने सोशल मीडियावरील चाहत्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सचिन तेंडुलकर हाच आवडता क्रिकेटपटू असल्याचे सांगितले होते. तेव्हा विहारीने भारतीय कर्णधार विराट कोहलीचे देखील कौतुक केले होते. या व्हिडिओत विहारीच्या आतापर्यंतच्या क्रिकेट प्रवासाबद्दल देखील सांगण्यात आले आहे.

विहारी हा सचिनपेक्षा २० वर्षांनी लहान आहे. जेव्हा विहारीचा जन्म झाला होता तेव्हा सचिनने क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. सचिनने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पहिला कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. तर विहारीने ८ डिसेंबर २०१८ रोजी पहिला कसोटी सामना खेळला. भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात विहारीला संघात स्थान देण्यात आले होते. पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. चार डावात फक्त एकदा त्याला १५ पेक्षा अधिक धावा करता आल्या होत्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here