नवी दिल्ली: आयपीएलमध्ये रविवारी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत झाली. या लढतीत चेन्नईचा ५४ धावांनी पराभव झाला. पंजाबने प्रथम फलंदाजी करत ८ बाद १८० धावा केल्या होत्या. लियाम लिव्हिंगस्टोने सर्वाधिक ६० धावा केल्या. तर शिखर धवन आणि जितेश सर्मा यांनी अनुक्रमे ३३ आणि २६ धावा केल्या. १८१ धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला फक्त १२६ धावा करता आल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक ५७ तर धोनीने २३ धावांचे योगदान दिले. अन्य सर्व फलंदाज अपयशी ठरले.

आयपीएलच्या १५व्या हंगामातील पहिल्या तिनही लढतीत चेन्नईचा पराभव झालाय. आयपीएलच्या इतिहासात अशी ही पहिलीच वेळ आहे जेव्हा चेन्नईने सुरुवातीच्या ३ लढती गमावल्या आहेत. या वर्षी हंगाम सुरू होण्याआधी धोनीने कर्णधारपद सोडले होते. नवा कर्णधार जडेजा आतापर्यंत कमाल करू शकला नाही. जडेजाला कर्णधार किंवा खेळाडू म्हणून देखील प्रभाव टाकता आला नाही.

चेन्नईच्या या पराभवामुळे गुणतक्त्यात ते नवव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्याच्या मागे आता फक्त सनरायझर्स हैदराबाद आहे. तर मुंबई इंडियन्स एक स्थान पुढे म्हणजेच आठव्या स्थानावर आहेत. राजस्थान रॉयल्स पहिल्या, कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या, गुजरात टायटन्स तिसऱ्या तर पंजाब किंग्ज चौथ्या स्थानावर आहे. आयपीएलची ९ विजेतेपद मिळवणारे दोन संघ मुंबई आणि चेन्नई हे सध्या तळाला आहेत.

ताजा गुणतक्ता

ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा)- ईशान किशन, मुंबई इंडियन्स- १३५ धावा
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट)- उमेश यादव, कोलकाता नाईट रायडर्स- ८ विकेट
फेअर प्ले- मुंबई इंडियन्स
मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअर- उमेश यादव

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here