नवी दिल्ली: भारतात करोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना घरी राहण्याचे आणि पीएम केअर्स फंडमध्ये आर्थिक मदत करण्यास सांगत आहेत. देशातील अनेक बड्या व्यक्ती, स्टार, खेळाडू या निधीत मदत करत आहेत. तर काही जण गरजू लोकांना अन्न-धान्य देत आहेत. भारताच्या एका खेळाडूने करोनाविरुद्धच्या लढ्यात दिलेल्या दानासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले आहे.

वाचा-
भारताचा गोल्फपटू याने पंतप्रधान केअर्स फंडमध्ये ४ लाख ३० हजार रुपये दिले आहेत. ही मदत देण्यासाठी अर्जुनने त्याने जिंकलेली १०२ चषकांची विक्री केली. १५ वर्षाच्या या अर्जुनने केलेल्या मदतीबद्दल सोशल मीडियातून त्याचे कौतुक केले जात आहे.

वाचा-
अर्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली आहे. यात तो म्हणतो, ‘गेल्या ८ वर्षात मी देशात आणि विदेशात जिंकलेल्या १०२ ट्रॉफी १०२ जणांना दिल्या आहेत. त्यातून आलेले ४ लाख ३० हजार रुपये पीएम केअर फंडसाठी दिला आहे. मी घेतलेला निर्णय ऐकल्यानंतर माजी आज्जी रडू लागली. ती म्हणाली, तु खरोखर अर्जुन आहेस. आज देशातील लोकांचा जीव वाचवण्यात तुझ्या ट्रॉफीचा उपयोग झाला. ट्रॉफी तर काय पुन्हा मिळतील.’

वाचा-

अर्जुन भाटीच्या या ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्वीट केले आहे. ”देशवासियों की यही वो भावना है, जो कोरोना महामारी के समय सबसे बड़ा संबल है.”, असे मोदींनी म्हटले आहे. त्यावर अर्जुनने, धन्यवाद सर ! ये मैंने आपसे ही सीखा है, अशा शब्दात त्यांचे आभार मानले आहेत.

देशात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. करोनाग्रस्तांची संख्या ५ हजारच्या पुढे गेली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या १४९वर गेली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here