वाचा-
ख्रिस गेलने कसोटी सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. गेलने १३ नोव्हेंबर २०१२ रोजी बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती. या सामन्यात सोहाग गाजीने बांगलादेशविरुद्ध पदार्पण केले होते. बांगलादेशचा कर्णधार मुशफिकुर रहीम याने पहिली ओव्हर गाजीला देण्याचा निर्णय घेतला.
वाचा-
गेलने गाजीच्या पहिल्याच चेंडूवर लॉग ऑनच्या वरून शानदार षटकार मारला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले होते की पहिल्याच चेंडूवर एखाद्या फलंदाजाने षटकार मारला.
वाचा-
याच सामन्यात गाजीने गेल याला २४ धावांवर बाद केले. गेलने १७ चेंडूत २४ धावा केल्या होत्या. यात प्रत्येकी दोन चौकार आणि षटकारांचा समावेश होता. पहिल्या डावात वेस्ट इंडिजने ५२७ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून पॉवेलने ११७, दिनेश रामदीनने नाबाद १२६ तर शिवनारायण चंद्रपॉलने नाबाद २०३ धावा केल्या. वेस्ट इंडिजला उत्तर देताना बांगलादेशने ५५६ धावा केल्या.
वाचा-
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजला २७३ धावा करता आल्या. गाजीने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ६ विकेट घेतल्या. पण बांगलादेशला या सामन्यात ७७ धावांनी पराभव स्विकारावा लागला.
कसोटी सर्वाधिक षटकाराचा विक्रम
ख्रिस गेलच्या नावावर १०३ कसोटी सामन्यात ९८ षटकार मारण्याचा विक्रम आहे. कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत न्यूझीलंडचा ब्रँडन मॅकुलम पहिल्या स्थानावर असून त्याने १०१ सामन्यात १०७ षटकार मारले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्टने १०० षटकार मारले आहेत. भारताकडून कसोटीत विरेंद्र सेहवागने १०४ सामन्यात ९१ षटकार मारले आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times