करोना व्हायरसचा मोठा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. त्यामुळे सर्व स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. सध्याच्या घडीला एकही स्पर्धा सुरु नाही. त्यामुळे खेळाडू सध्या घरी बसून आहेत. काही खेळाडू आपले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अशाच एका क्रिकेटपटूचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हा क्रिकेटपटू महिलेच्या रुपात दिसत आहे. या क्रिकेटपटूने ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टीकही लावलेली पाहायला मिळत आहे. या क्रिकेटपटूचे नेमके असे काय झाले, असा विचार तुम्ही करत असाल, तर जाणून घ्या…
हा खेळाडू आहे तरी कोण…महिलेच्या रुपात असलेला हा क्रिकेटपटू कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा पाकिस्तानचा माजी फिरकीपटू साकलेन मुश्ताक आहे. पाकिस्तानकडून खेळताना साकलेनने दिग्गज फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले होते. निवृत्तीनंतर साकलेन हा काही संघांना प्रशिक्षणही देत होता. काही आंतरराष्ट्रीय संघांनाही साकलेनने प्रशिक्षण दिलेले आहे. सध्या करोना व्हायरसमुळे तो आपल्या घरीच आहे.
नेमके घडले तरी काय…
साकलेन सध्या आपल्या घरीच आहे. साकलेनला एक लहान मुलगी आहे. तिने साकलेनकडे एक हट्ट केला होता. तिला साकलेनला महिलेच्या रुपात बघायचे होते. साकलेनला हा हट्ट पुरवावा लागला. त्यामुळे साकलेनने ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टीक लावली आणि डोक्यावर महिलांचा केसांचा विक लागवा. या गोष्टीचा व्हिडीओ साकलेनने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times