पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. दानिशने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दानिशने हनुमानांचा फोटो लावला आहे आणि सर्वांना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळत आहे. दानिश हा पाकिस्तानच्या संघातील हिंदू खेळाडू होता, हे काही जणांना माहिती नसेल. पण पाकिस्तानकडून खेळणारा दानिश हा पहिला हिंदू खेळाडू नव्हता. कारण पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारा पहिला हिंदू खेळाडूचा मान अनिल दलपत यांना मिळाला होता.
‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने (
) पाकिस्तानचा माजी फिरकीपटू
(
) याच्या संदर्भात हा गौप्यस्फोट केला आहे. दानिश हिंदू होता आणि त्यामुळेच पाकिस्तानी संघ त्याला चांगली वागणूक देत नव्हता. पाकिस्तानकडून खेळत असताना त्याच्यासोबत खुप चुकीचे झाले.
वाचा-
पाकिस्तान संघातील काही खेळाडू तर दानिश सोबत का एकत्र जेवतोस असा प्रश्न विचारत होते, असे शोएबने एका चॅट शोमध्ये सांगितले. दानिशने पाकिस्तानकडून ६१ कसोटीत २६१ तर १८ वनडेत १५ विकेट घेतल्या आहेत. या चॅट शोमध्ये माजी क्रिकेटपटू असीम कमाल आणि राशिद लतीफ सोबत काही खुलासे केले.
आमच्याकडे काही खेळाडूंचे करिअर ड्रेसिंग रुममध्ये खराब केले जाते. युसुफ योहानाने १२ हजार धावा केल्या. पण आम्ही कधी त्याचा सन्मान केला नाही. दानिश कनेरिया हिंदू असल्याच्या मुद्द्यावरून दोघा तिघा खेळाडूंशी माझे वाद झाल्याचे देखील शोएबने सांगितले. ज्याच्याशी संघातील खेळाडू कधी चांगले वागले नाहीत. त्या दानिशने आम्हाला कसोटी मालिका जिंकून दिल्याचे शोएबने सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times