सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. त्याचबरोबर या लढ्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक बळी महत्वाचे आहे. करोनाशी लढण्यासाठी भारत-पाकिस्तान सामन्याचे आयोजन करा आणि या गोष्टीशी लढण्यासाठी मदत जमा करा, असे वक्तव्य एका पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने केले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील द्विदेशीय सामना गेल्या १२ वर्षांपासून जास्त काळ झालेला नाही. पाकिस्तानच्या कुरघोड्या पाहता भारताने पाकिस्तानबरोबर द्विदेशीय मालिका किंवा सामने खेळायला नकार दिलेला आहे. पण पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळासहीत त्यांच्या आजी-माजी खेळाडूंना मात्र भारताबरोबर मालिका खेळवायची आहे.

करोनाचा फटका सर्वांनाच बसलेला आहे. या लढ्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून मिळू शकते. त्यामुळे करोनाशी लढण्यासाठी जो मदत निधी लागेल, तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भरवून मिळवता येऊ शकतो, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २००७ सालानंतर एकही मालिका झालेली नाही. यानंतर भारत आणि पाकिस्तान काही सामने खेळले आहेत, पण ते आयसीसीच्या स्पर्धांमधील. पण दोन्ही देशांची क्रिकेट मालिका ही २००७ सालानंतर झालेली नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळवायचा की नाही, हा निर्णय दोन्ही क्रिकेट मंडळाला घ्यावा लागणार आहे. पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ भारताबरोबर सामना किंवा मालिका खेळवायला तयार आहे. पण दुसरीकडे बीसीसीआयने हा चेंडू भारत सरकारच्या कोर्टात टाकला आहे. भारत सरकारने जर आम्हाला परवानगी दिली तर आम्ही पाकिस्तानशी दोन हात करू शकतो, पण जर आम्हाला सराकारने परवानगी दिली नाही तर आम्हाला पाकिस्तानबरोबर द्विदेशीय सामना किंवा मालिका खेळता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने घेतलेली आहे. त्यामुळे आता या सामन्यासाठी भारत सरकार परवानगी देणार का आणि हा सामना नेमका कुठे आणि कधी खेळवला जाईल, याची उत्सुकता आता चाहत्यांना असेल. कारण भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास कधीही तयार होणार नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here