ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थाटन रॉयल्सने पहिले आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. यंदा अजून आयपीएल सुरु झालेले नाही. पण वॉर्नने मात्र आपला सर्वोत्तम आयपीएलचा संघ जाहीर केला आहे. या संघाच त्याने भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला स्थान दिलेले नसल्यामुळे बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

वॉर्नने आज आपला आयपीएलचा अकरा सदस्यीस संघ जाहीर केला आहे. या संघात सचिनबरोबर ख्रिस गेल, एबी डीव्हिलियर्स, सुरेश रैना यासारख्या आयपीएलमधील दिग्गज खेळाडूंना स्थान दिले आहे. त्याचबरोबर त्याने संघात घेतलेल्या काही खेळाडूंची नावं वाचल्यावर तुम्हालाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

वॉर्नने आपल्या आयपीएलच्या संघात सलामीवीरांची जबाबदारी रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यावर सोपवली आहे. या संघात तिसऱ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार विराट कोहलीला स्थान देण्यात आलेले आहे. संघातील सर्वात महत्वाचे स्थान असलेल्या चौथ्या क्रमांकावर त्याने युवराज सिंगला संधी दिली आहे. पाचव्या स्थानावर अष्टपैलू युसूफ पठाणला संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला स्थान देण्यात आले आहे.

या संघात वॉर्नने दोन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश केला आहे. पठाणबरोबर या संघात रवींद्र जडेजाला अष्टपैलू खेळाडू म्हणून ठेवले आहे. या संघात एकमेव फिरकीपटू असून हरभजन सिंगला या स्थानासाठी निवडले आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानवर सोपवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुनाफ पटेल आणि सिद्धार्थ त्रिवेदी या दोन गोलंदाजांचाही या संघात समावेश करण्यात आलेला आहे. वॉर्नने जेव्हा आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. तेव्हा युसूफ, मुनाफ आणि सिद्धार्थ यांनी पूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या तिघांना संघात स्थान देण्यात आला आहे.

वॉर्नने निवडलेला आयपीएलचा अकरा सदस्यीय सर्वोत्तम संघ
रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, युसूफ पठाण, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, सिद्धार्थ त्रिवेदी, मुनाफ पटेल, झहीर खान.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here